शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत कुष्ठरोग शोध अभियान सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 00:35 IST

महापालिकेच्या वतीने शहरात कुष्ठरोग शोध अभियान सुरू करण्यात आले असून, २४ सप्टेंबर रोजी आरोग्य सभापती सचिन देशमुख यांच्या हस्ते या अभियानाचे उद्घाटन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महापालिकेच्या वतीने शहरात कुष्ठरोग शोध अभियान सुरू करण्यात आले असून, २४ सप्टेंबर रोजी आरोग्य सभापती सचिन देशमुख यांच्या हस्ते या अभियानाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी नगरसेविका अनिता रवि सोनकांबळे, फरहत सुलताना शेख मुजावेद, सहायक आयुक्त अब्दुल मुक्तहिद खान, आरोग्य सेवेच्या सहायक संचालक डॉ.विद्या सरपे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरवसे यांची प्रमुख उपस्थिती होती. २४ सप्टेंबरपासून ते ९ आॅक्टोबर या कालावधीत शहरात हे अभियान राबविले जाणार आहे. अभियान कालावधीत आशा कार्यकर्ती, स्वयंसेवक घरोघरी जाऊन तपासणी करणार आहेत. परभणी शहरात १२६ पथके आणि ग्रामीण भागात १०२७ पथकांची या कामी नेमणूक करण्यात आली आहे. ही पथके संशयितांची नोंदणी करुन या रुग्णांना जवळच्या शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी पाठविणार आहेत. नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य सभापती सचिन देशमुख यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम.जी. पवार यांनी केले.कार्यक्रमास एम.जी. कांदे, बी.जी. राठोड, पी.एम. बचाटे, आर.एस. नरवाडे, बी.आर. चव्हाण आदींनी प्रयत्न केले.

टॅग्स :parabhaniपरभणीMuncipal Corporationनगर पालिका