शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत प्लॅस्टिकचा सहा क्विंटल साठा जप्त; महापालिकेची धडक कारवाई

By राजन मगरुळकर | Updated: June 20, 2023 14:20 IST

या ठिकाणी जवळपास अडीचशेहुन अधिक पोते प्लास्टिकचा वापर असलेले साहित्य जप्त करण्यात आले.

परभणी : प्लास्टिक बंदी असताना प्लास्टिक साहित्याचा वापर करून त्याचा साठा केल्याप्रकरणी मनपाच्या पथकाने शहरातील गंगाखेड रोड भागातील एका कारखान्यावर मंगळवारी सकाळी धडक कारवाई केली. यामध्ये अंदाजे सहा क्विंटल प्लास्टिकचा साठा जप्त करण्यात आला आहे.  जप्त केलेल्या साहित्याची अजूनही मोजदाद सुरू आहे. 

मनपाच्या आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या आदेशान्वये अतिरिक्त आयुक्त डॉ.उत्कर्ष गुट्टे यांच्यासह स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, श्रीकांत कुऱ्हा यांच्यासह विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांनी व पथकाने गंगाखेड रोड भागात मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास एका कारखान्यावर छापा टाकला. या ठिकाणी जवळपास अडीचशेहुन अधिक पोते प्लास्टिकचा वापर असलेले साहित्य जप्त करण्यात आले. तसेच ज्या प्लास्टिकचा वापर करण्यास बंदी आहे, असा साठा जप्त करून त्याची मोजदाद सुरू करण्यात आली आहे. बाबत संबंधित कारखाना मालक यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले. काही महिन्यांमधील ही सर्वात मोठी कारवाई मनपाने केले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीPlastic banप्लॅस्टिक बंदी