शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

परभणी : धक्कादायक! धावत्या एसटी बसची दोन चाकं निखळली

By ज्ञानेश्वर भाले | Updated: October 16, 2022 14:55 IST

पूर्णा-नांदेड महामार्गाजवळील चुडावा येथील घटना

परभणी : पूर्णा तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एसटी महामंडळाच्या धावत्या बसची एकामागून एक अशी दोन चाकं निखळून पडल्याची घटना रविवारी सकाळी ७ वाजता घडली. या बसमधून आठ ते दहा प्रवासी प्रवास करत होते. चालकाच्या समय सुचतकतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

वसमत आगार बस स्थानकातून वसमत ते धानोरा मोत्या (एम एच १४ बीटी१९५५) ही बस शनिवारी रात्री धानोरा मोत्या येथे मुक्कामी थांबली होती. रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास धानोरा मोत्यायेथून वसमतकडे निघाली होती. या बसमध्ये चालक वाहकासह आठ ते दहा जण प्रवास करत होते. राज्य मार्ग २५५ वरून धावत असताना अचानक चुडावा जवळ येताच बसचे मागील एक चाक निखळून पडले. मात्र तरीही बस धावत होती. दरम्यान ३३ केव्ही कार्यालयाजवळ येताच दुसरेही चाक निखळून पडल्याने एकदम गाडीचे संतूलन गेले. ही बाब चालकाच्या लक्षात येताच चालकांने तात्काळ बसवर ताबा मिळवत बस थांबविली. चालकाने पाहणी केल्यानंतर नट निखळल्याने हा प्रकार घडल्याचे लक्षात आले. सुदैवाने ही घटना महामार्गापासून काही अंतरावर घडल्याने मोठा अनर्थ टळला.

प्रवासी बचावलेवसमत - धानोरा मोत्या बसमधून दरारोज मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. दरम्यान रविवारी सुटी असल्न्याने आठ ते दहा प्रवाशीच प्रवास करत होते. मात्र असे असले तरी घटना धक्कादाखक असून महामंडळाचा निष्काळजीपणा प्रवाशांच्या जीववार बेतत असल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे.

पर्यायी व्यवस्था केली नाहीबसची चाकं निखळल्यानंतर बसमधील प्रवाशांची व्यवस्था करणे गरजेचे असताना असे न करता प्रवाशांना इतर साधनांचा आधार घेत प्रवास करावा लागला.

टॅग्स :Bus Driverबसचालक