शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

प्रॉपर्टी पुढे नाते फिके पडले, जमिनीच्या वादातून सख्ख्या भावानेच केला खून

By ज्ञानेश्वर भाले | Updated: April 30, 2024 15:38 IST

सेलू तालुक्यातील मोरेगावात सोमवारी रात्रीची घटना

सेलू (जि. परभणी) : मोरेगावात सोमवारी रात्री आठ वाजेदरम्यान एका मंदिरात जेवणासाठी गेलेल्या एकास जमिनीच्या वादातून सख्या भावानेच धारदार शस्त्राने मारहाण करून त्याचा खून केल्याचा दुर्दैवी प्रकार घडला आहे. मधुकर मारोतराव मगर असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस सुत्रांकडून मिळाली आहे.          याबाबत अधिक माहिती अशी की, मधुकर मारोतराव मगर (रा. मोरेगाव, ता.सेलू) हे सोमवारी रात्री आठदरम्यान मोरेगावातील मोरेश्वरी मंदिरात जेवणाच्या कार्यक्रमासाठी गेले असता तेथे राजेभाऊ ऊर्फ अशोक मारोतराव मगर हेही होते. यावेळी जमिनीच्या वादातून मोठा भाऊ राजेभाऊ ऊर्फ अशोक याने लहान भाऊ मधुकर मगर याच्या गळ्यावर, डाव्या पायावर, तोंडावर, छातीचे डाव्या बाजूस मारुन त्याचा खून केला आहे. 

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी सुनिल ओव्हाळ, पो.नि. दिपक बोरसे, सपोनि सुनील चव्हाण, पोउपनि अशोक जटाळ, पोलीस हवालदार शिवदास सुर्यवंशी हे तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. याप्रकरणी मयताची पत्नी अलका मगर यांच्या फिर्यादीवरून आरोपी राजेभाऊ ऊर्फ अशोकविरूद्ध सेलू ठाण्यात गुन्हा दाखल करत त्यास अटक करण्यात आली आहेत. तपासकामी पोउपनी अशोक जटाळ यांचेकडे देण्यात आले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी