शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! मान्यतेला बगल, परभणीत कृषी विद्यापीठाचा २९ कोटींचा ‘बिनमान्यता’ ठेका!

By मारोती जुंबडे | Updated: August 12, 2025 14:08 IST

कार्यकारी, कृषी परिषदेला डावलून केला खर्च; १०८ कामांचा शासनाला द्यावा लागणार हिशोब

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने कार्यकारी परिषद आणि महाराष्ट्र राज्य कृषी परिषद यांच्या मान्यतेला बगल देत तब्बल २९ कोटी रुपयांचा खर्च केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. विविध इमारतींच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी करण्यात आलेल्या या खर्चाची नोंद त्रिसदस्य समितीच्या अहवालात समोर आली आहे. त्यामुळे आता विद्यापीठ प्रशासनाला या संपूर्ण खर्चाचा लेखाजोखा शासनासमोर सादर करावा लागणार आहे.मागील काही महिन्यांपासून संशोधन व बियाणे विकासाऐवजी वाढत्या बांधकामांमुळे विद्यापीठ चर्चेत होते. ‘लोकमत’ने यापूर्वी या प्रकरणावर प्रकाश टाकत, कार्यकारी परिषदेच्या मान्यतेशिवाय १३ कोटींची कामे पार पाडल्याचे, निविदेविना ९ कामांवर सात कोटींचा अतिरिक्त खर्च केल्याचे, आठ लाखांच्या कामांची किंमत वाढवून ५५ लाखांपर्यंत नेल्याचे आणि इतर अनियमिततेचे वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्तानंतर राज्य शासन आणि कृषी परिषदेने हा प्रकार गांभीर्याने घेत त्रिसदस्य समिती नेमली होती. ९ ते ११ जून २०२५ दरम्यान या समितीने नियंत्रक कार्यालय आणि अभियंता विभागातील दस्तऐवजांची तपासणी केली. तपासणीत, कृषी परिषदेची प्रशासकीय मान्यता न घेता ६७ कामे आणि कार्यकारी परिषदेची मान्यता न घेता ४१ कामे अशा एकूण १०८ कामे पूर्ण करण्यात आल्याचे समोर आले आहे; ही चर्चा रविवारी विद्यापीठ परिसरात रंगली होती.आता शासनाकडे द्यावी लागणार उत्तरेशासनाकडून या खर्चासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाकडे स्पष्टीकरण मागणी होणार असून, नियमबाह्य पद्धतीने करण्यात आलेल्या कामांबाबत कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे विद्यापीठ प्रशासनावर पारदर्शकतेचा आणि जबाबदारीचा प्रश्न उपस्थित झाला आहे.विद्यापीठ महसुलातूनच ३४ लाखांचे वाहन घेतलेवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात विद्यापीठ महसुलात कोट्यवधी रुपये दरवर्षी जमा होतात. हे पैसे बहुतेक संशोधन, विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधा तसेच प्रकल्पांवर खर्च करणे अपेक्षित असते; मात्र मागील काही वर्षांत हा निधी बांधकामासह दुरुस्तीवर खर्च करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या निधीतून ३४ लाख ३० हजार ३२३ रुपये खर्च करून एक वाहनही खरेदी करण्यात आले आहे.अधिकार तीन लाखांच्या कामांना; प्रशासकीय मान्यता दिली ३३ कोटींनाजगात जर्मनी आणि भारतात परभणी हे वाक्य काही वेळा जिल्ह्यासाठी लागू झालेले आहे. परभणीच्या कृषी विद्यापीठात तीन लाखांच्या कामांवर तसेच विद्यापीठाच्या महसुलातून खर्च करताना कार्यकारी परिषदेची मान्यता घेणे आवश्यक आहे. मात्र, प्रशासनाने ती मान्यता न घेता सादर केलेल्या सारसंग्रहाच्या आधारावर ३३ कोटी ५० लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे, यापैकी २९ कोटी रुपयांचे बिल संबंधित कंत्राटदारांना अदा केले गेले आहेत.

शासन तपासणार आता अभिलेखवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात झालेल्या १०० हून अधिक कामांविषयी शासनाला तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या तक्रारींनंतर त्रिसदस्य समितीने तपासणी करून त्याचा अहवाल शासनाला सादर केल्याचा समज आहे. या अहवालाद्वारे शासन आता केलेल्या कामांचा अभिलेख तपासणार आहे.

कुलगुरूंना बाहेरचा रस्ता दाखवामागील २ वर्षांपासून आम्ही सातत्याने राज्यपाल, कृषिमंत्री आणि कृषी परिषदेच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे सत्य परिस्थिती उघड झाली आहे. या चौकशीतून ठेकेदारांना पोसण्यासाठी शेतकऱ्यांचा खजिना रिता करणाऱ्या कुलगुरूंना बाहेरचा रस्ता दाखवावा, अशी विनंती आम्ही राज्यपाल महोदयांना भेटून करणार आहोत.- प्रविण देशमुख, सदस्य, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे

टॅग्स :Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeethवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठparabhaniपरभणीEducation Sectorशिक्षण क्षेत्र