शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात गंगाखेडमध्ये शिवसेनेचा आक्रोश मोर्चा धडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 00:38 IST

गंगाखेड विधानसभा मतदार संघातील शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांवर १६ एप्रिल रोजी खा़ बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोठा मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकला़ या मोर्चात मतदार संघातील शिवसैनिकांसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड : गंगाखेड विधानसभा मतदार संघातील शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांवर १६ एप्रिल रोजी खा़ बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोठा मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकला़ या मोर्चात मतदार संघातील शिवसैनिकांसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़मतदार संघातील शेतकऱ्यांना पीक विमा वितरित करावा, गारपिटीचे व बोंडअळीचे अनुदान त्वरित द्यावे, मूग, उडीद, तीळ, तूर या पिकांना शंभर टक्के विमा द्यावा, पीक विम्याची रक्कम कर्ज खात्यात जमा करू नये, शेतकºयांची कुचेष्टा करणाºया खाजगी पीक विमा कंपनीकडील पीक विमा योजना रद्द करावी, विमा कंपनीविरूद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला़सोमवारी सकाळी ११़३० वाजेच्या सुमारास खा़बंडू जाधव यांच्या नेतृत्वखाली भगवती चौक येथून मोर्चाला प्रारंभ झाला़ सरकारविरोधी घोषणा देत शहरातील मुख्य रस्त्याने हा मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकला़ संत जनाबाई शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयासमोरील प्रांगणावर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले़ यावेळी शिवसेनेचे गंगाखेड विधानसभाप्रमुख संतोष मुरकुटे यांनी प्रास्ताविक केले़ भाजप सरकारने प्रत्येक गोष्टीत शेतकºयांवर अन्याय केला़ हे सरकार केवळ घोषणा देत असून, अंमलबजावणी करीत नाही़ गंगाखेड मतदार संघातील लोकप्रतिनिधी व इतर पक्षातील पुढारी निधी आणण्याच्या कारणावरून आपसात वाद घालत आहेत़ लोकप्रतिनिधी व नेत्यांना शेतकºयांच्या प्रश्नांशी देणे-घेणे नाही, असा आरोप मुरकुटे यांनी केला़ त्यानंतर उपविभागीय अधिकारी सुचिता शिंदे, तहसीलदार जीवराज डापकर यांना निवेदन देण्यात आले़ या प्रसंगी जिल्हाप्रमुख विशाल कदम, उपजिल्हाप्रमुख दशरथ भोसले, महिला आघाडीच्या सखुबाई लटपटे, अर्जुन सामाले, तालुकाप्रमुख विष्णू मुरकुटे, हनुमंत पौळ, काशीनाथ काळबांडे, अ‍ॅड़ महेश साळापुरीकर, बालासाहेब निरस, गजानन पवार, नितीन कदम, संजय सारणीकर, बाळासाहेब राखे, संदीप वाळके, अमोल दिवाण, नागेश कोनार्डे, अनिल सातपुते, संदीप राठोड, जानकीराम पवार, माधव शेंडगे आदींसह शिवसैनिक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते़खाजगी कंपन्यांसाठी शेतकºयांचा बळी घेतला-जाधवखाजगी कंपन्या जगविण्यासाठी हे सरकार शेतकºयांचे बळी घेत आहे़, असा आरोप खा़बंडू जाधव यांनी यावेळी केला़ दुष्काळामुळे संकटात असलेल्या शेतकºयांसाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कडक भूमिका घेतल्यानेच सरकारला कर्जमाफीची घोषणा करावी लागली़ मात्र ही घोषणा केल्यानंतर शेतकºयांना लाभ मिळाला नाही़ उद्योगपती आदानी, आंबानी हेच देश चालवित असून, त्यांच्या खाजगी कंपन्यांनी शेतकºयांना रात्र-दिवस रांगेत उभे करून पीक विमा भरून घेतला़ खरीप हंगामात मोठे नुकसान झाले असतानाही या कंपन्यांनी विम्यापोटी भरलेल्या रकमेतील १० टक्के रक्कमही शेतकºयांना परत दिली नाही़ राज्य शासन व विमा कंपनीने शेतकºयांची क्रूर चेष्टा केली असून, हा अन्याय पाहवत नसल्याने राज्य व केंद्रात सत्तेत असूनही केवळ समाजहितासाठी शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करीत असल्याचे खा़ जाधव यांनी सांगितले़ यावेळी खा़ बंडू जाधव यांनी आपल्या भाषणात पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्यासह इतर नेत्यांवरही तोफ डागत सत्यता पडताळून आरोप करण्याचा सल्ला दिला़

टॅग्स :parabhaniपरभणीShiv Senaशिवसेना