शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशनात सरकारला जाब विचारणार

By admin | Updated: March 2, 2015 13:40 IST

शेतकर्‍यांना मदत करण्याऐवजी त्यांची कुचेष्टा करण्याचा प्रकार सरकार करीत असून, आगामी अधिवेशनात याप्रश्नी शासनाला जाब विचारणार असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितले.

परभणी : दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी शासनाने ७ हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले, परंतु प्रत्यक्षात केवळ २ हजार कोटींचीच मदत वाटप होत आहे. शेतकर्‍यांना मदत करण्याऐवजी त्यांची कुचेष्टा करण्याचा प्रकार सरकार करीत असून, आगामी अधिवेशनात याप्रश्नी शासनाला जाब विचारणार असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितले.२८ फेब्रुवारी रोजी परभणी तालुक्यातील दुर्डी या गावास भेट देऊन धनंजय मुंडे यांनी दुष्काळाची पाहणी केली. ते म्हणाले, ४५ रुपये गुंठा या प्रमाणे राज्य शासन मदत देत आहे. दिलेली मदतही जाणीवपूर्वक उशिरात उशिरा दिली जात आहेत. प्रशासनाकडूनही बागायतीचे क्षेत्र कसे कमी दाखविता येईल, याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातच अवकाळी पावसाने शेतात जी काही पिके उभी होती त्याचेही नुकसान झाले. त्यामुळे अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचीही भरपाई शासनाने शेतकर्‍यांना द्यावी, यासाठी आपण आग्रही राहणार असून, आगामी अधिवेशनात सरकारला जाब विचारणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले. दुर्डी येथील संजय चोपडे यांच्या शेतासही त्यांनी भेट दिली. यावेळी राकाँ जिल्हाध्यक्ष तथा आ.विजय भांबळे, शहर जिल्हाध्यक्ष अँड.स्वराजसिंह परिहार, तालुकाध्यक्ष सुरेश भुमरे, माजी खा.सुरेश जाधव आदींची उपस्थिती होती.रविवारी मुंडे यांनी जिंतूर तालुक्यातील पांगरी या गावासही भेट दिली. भर पावसात त्यांनी या गावातील दुष्काळाची पाहणी केली. यावेळी आ. विजय भांबळे, माजी खा.सुरेश जाधव, जि .प. उपाध्यक्ष राजेंद्र लहाने, जि. प. सदस्य विश्‍वनाथ राठोड, रामेश्‍वर जावळे, नानासाहेब राऊत, गजानन कांगणे, सुधाकर जाधव, शरद अंभुरे, प्रसाद बुधवंत, केशव बुधवंत आदींची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीका केली. हे सरकार शेतकरी विरोधी असून, संकटग्रस्त शेतकर्‍यांना मदत करण्याऐवजी देशोधडीला लावण्याचे काम सरकार करीत असल्याची टीका त्यांनी केली. /(प्रतिनिधी)

आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना मदत> विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी वरुड नृसिंह येथील आत्महत्याग्रस्त महादेव डोंबे यांच्या कुटुंबियांना भेट देऊन ५0 हजार रुपयांची आर्थिक मदत केली. यावेळी त्यांनी डोंबे कुटुंबियांच्या दोन्ही मुलींच्या नावे प्रत्येकी २५ हजार रुपये देण्याचे जाहीर केले. राकाँचे प्रदेश सचिव डॉ.संजय रोडगे यांनी एका मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचे मान्य केले. यावेळी आ.विजय भांबळे, नानासाहेब राऊत, माजी खा. सुरेश जाधव, रामेश्‍वर जावळे, शरद अंभुरे, जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र लहाने, मनोज थिटे, सिरकू पाटील, विजय खिस्ते, बाळासाहेब भांबळे, गजानन कांगणे आदींची उपस्थिती होती.