शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

जप्त वाळू साठ्याचा मुक्काम आता विश्रामगृहात; वाळू चोरी होण्याच्या शक्यतेने गंगाखेड तहसील प्रशासनाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 13:47 IST

वाळूमाफियांनी विनापरवाना निर्माण केलेले वाळूसाठे महसूल प्रशसनाने जप्त केले होते. हे वाळू साठे चोरीस जाऊ नये म्हणून येथील शासकीय विश्रामगृह परिसरात हलविण्यात आले आहेत. 

ठळक मुद्दे रस्त्याच्या बाजूला, शेतात, शासकीय जमिनीवर असल्याने नेमके कोणाचे साठे आहेत ? याचा अंदाज महसूल प्रशासनला येत नव्हता. हे साठे महसूल प्रशासनाने जप्त करून या साठ्यांचा लिलाव पुकारला होता. या वाळूसाठ्याची चोरी होण्याची शक्यता बळावत असल्याने तहसील प्रशासनाने हे वाळू साठे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृह परिसरात हलविले आहेत.

गंगाखेड ( परभणी ): वाळूमाफियांनी विनापरवाना निर्माण केलेले वाळूसाठे महसूल प्रशसनाने जप्त केले होते. हे वाळू साठे चोरीस जाऊ नये म्हणून येथील शासकीय विश्रामगृह परिसरात हलविण्यात आले आहेत. 

गंगाखेड तालुक्यातील महातपुरी, मैराळ सांगवी, खळी, दुस्सलगाव, महातपुरी तांडा, गंगाखेड शहर, कासारवाडी परिसर, झोला, पिंपरी, मसला, धारखेड, मुळी, गौंडगाव, भांबरवाडी आदी परिसरात वाळूमाफियांनी गोदावरी नदीतील वाळू उपसा करून साठे तयार केले होते. हे साठे रस्त्याच्या बाजूला, शेतात, शासकीय जमिनीवर असल्याने नेमके कोणाचे साठे आहेत ? याचा अंदाज महसूल प्रशासनला येत नव्हता. हे साठे महसूल प्रशासनाने जप्त करून या साठ्यांचा लिलाव पुकारला होता. परंतु, काही वाळू साठे बेनामी अज्ञातांच्या नावे असल्याने या साठ्यांना लिलावात बोली आली नाही. महसूल प्रशासनाने असे वाळू साठे स्वत: उचलून शासकीय कामावर टाकून ठेकेदाराला विकण्याचा निर्णय घेतला.

रेल्वे उड्डाणपूल, नगरपालिकेच्या अंतर्गत बांधकामासाठी वाळू देऊन याची रक्कम ठेकेदारांकडून वसूल केली. मात्र, महातपुरी परिसरातील काही बेनामी वाळू साठे कोणीही खरेदी केले नाही. त्यामुळे २५० ब्रास वाळू पडून होती. या वाळूसाठ्याची चोरी होण्याची शक्यता बळावत असल्याने तहसील प्रशासनाने हे वाळू साठे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृह परिसरात हलविले आहेत. आता या वाळूसाठ्याची जबाबदारी येथील कर्मचा-यांवर वाढली आहे. यातील वाळू कमी झाल्यास विश्रामगृहातील कर्मचा-यांना दोषी धरले जाणार आहे. 

कर्मचारी असमर्थ की अविश्वास...गंगाखेड तालुक्यातून वाहणा-या गोदावरी नदीतील वाळूला जिल्हाभरासह पर जिल्ह्यात मागणी आहे. त्यामुळे रात्रंदिवस वाळू उपसा केला जातो. वाळू साठे तयार करून शासकीय जमिनीवरच ठेवण्याचे धाडस माफियांमधून होत आहे. त्या त्या भागातील महसूलचे कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्यानेच वाळू साठे तयार करण्याचे धाडस माफिया करीत आहेत. त्यामुळे त्यांचे मनोबल उंचावले आहे. तसा आरोपही नागरिकांमधून होत आहे. त्यामुळे तहसील प्रशासनावर वाळूसाठे उचलून विश्रामगृह परिसरात हलविण्याची नामुष्की ओढावली आहे. 

जप्त वाळूसाठ्यांचा जाहीर लिलाव केला जात आहे. मात्र, शासकीय जमिनीवर असलेले बेनामी वाळूसाठे लिलावात घेत नसल्याने हे वाळू साठे शासकीय कामासाठी ठेकेदारांना दिले जात आहेत. तसेच ते वाळू साठे चोरीस जाऊ नयेत म्हणून शासकीय विश्रामगृह परिसरात हलविण्यात आले आहेत. - आसाराम छडीदार, तहसीलदार