शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जलसाठा घटल्याने टंचाईची वाढली तीव्रता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:15 IST

परभणी : जिल्ह्यातील ८ लघु प्रकल्पांमध्ये पाण्याचा ठणठणाट असल्याने या प्रकल्पांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावांमध्ये पाणी टंचाईचे संकट तीव्र होत ...

परभणी : जिल्ह्यातील ८ लघु प्रकल्पांमध्ये पाण्याचा ठणठणाट असल्याने या प्रकल्पांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावांमध्ये पाणी टंचाईचे संकट तीव्र होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटाचा सामना करणाऱ्या प्रशासनाला आता टंचाईसाठी देखील कामे हाती घ्यावी लागणार आहेत.

जिल्ह्यात यावर्षी कोरोनाचे संकट निर्माण झाल्याने पाणीटंचाई निवारणाच्या कामांकडे दुर्लक्ष झाले. उन्हाळ्याला सुरुवात झाली असतानाही प्रशासनाने टंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली नाही.

मागील वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध झाला होता. त्यामुळे आतापर्यंत टंचाई जाणवली नाही; परंतु मागच्या काही दिवसांपासून प्रकल्पांमधील पाणीसाठा कमी होत आहे. जिल्ह्यात एकूण २२ लघु प्रकल्प असून, त्यातील ८ लघु प्रकल्प कोरडेठाक आहेत. या प्रकल्पात पाणीच नसल्याने परिसरातील गावांमध्ये टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. याशिवाय ७ प्रकल्पांमध्ये केवळ २५ टक्‍क्‍यांपर्यंत साठा शिल्लक आहे. त्यामुळे भविष्यात लघु प्रकल्पांच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

...हे प्रकल्प कोरडे

परभणी तालुक्यातील पेडगाव, सोनपेठ तालुक्यातील नखतवाडी, जिंतूर तालुक्यातील देवगाव, जोगवाडा, बेलखेडा, चारठाणा, चिंचोली, आडगाव, केहाळ या प्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा आहे.

बंधाऱ्यांनी अनेक गावांना तारले

प्रकल्पांमधील पाणीसाठा कमी झाला असला तरी गोदावरी नदी पात्रावर असलेल्या बंधाऱ्यांमध्ये मात्र पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे या बंधार्‍यातून अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. पालम तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्यात १६.२७ दलघमी, मुद्गल बंधाऱ्यात ४.५४ दलघमी, ढालेगाव बंधाऱ्याचे ७.३९ आणि तारूगव्हाण येथील बंधाऱ्यात ५.३९ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. या पाण्यावर परिसरातील अनेक गावांची तहान भागविली जात आहे.

मध्‍यम प्रकल्‍पात १८ दलघमी साठा

जिल्ह्यात दोन मध्यम प्रकल्प आहेत. त्यात एकूण १८ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. जिंतूर तालुक्यातील करपरा प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता २८.५ दलघमी असून, प्रत्यक्षात या प्रकल्पात केवळ ८.५२ दलघमी जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे, तर गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ३४.०८ दलघमी असून, या प्रकल्पात सध्या १०.९४ दलघमी जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे दोन्ही प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये आणखी एक ते दीड महिना पाणी उपलब्ध होऊ शकते.