शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

परभणीकरांना भेडसावणार टंचाई : राहटीतील पाणी संपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:29 IST

शहराला पाणीपुरवठा करणाºया राहटी बंधाºयातील पाणीसाठा सोमवारी सकाळी संपल्याने आता परभणी शहराला पाणीटंचाईला तोंड देण्याची वेळ आली आहे. महानगरपालिकेचे नियोजन नसल्याने हिवाळ्यातही शहरवासियांना टंचाईचे चटके सोसावे लागणार आहेत. विशेष म्हणजे एक महिन्यात पाणीसाठा संपण्याची ही दुसरी वेळ आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहराला पाणीपुरवठा करणाºया राहटी बंधाºयातील पाणीसाठा सोमवारी सकाळी संपल्याने आता परभणी शहराला पाणीटंचाईला तोंड देण्याची वेळ आली आहे. महानगरपालिकेचे नियोजन नसल्याने हिवाळ्यातही शहरवासियांना टंचाईचे चटके सोसावे लागणार आहेत. विशेष म्हणजे एक महिन्यात पाणीसाठा संपण्याची ही दुसरी वेळ आहे.परभणी शहराला राहटी येथील बंधाºयातून पाणीपुरवठा होतो. या बंधाºयात सिद्धेश्वर धरणामधून पाणी घेतले जाते. डिसेंबरमध्ये पहिल्याच आठवड्यात बंधाºयातील पाणी संपले होते, तेव्हा महानगरपालिकेने सिद्धेश्वर बंधाºयातून शहरासाठी पाण्याची मागणी नोंदविली. १ दलघमी पाणी राहटी बंधाºयात दाखल होईपर्यंत ३ दिवस शहरवासियांना निर्जळीचा सामना करावा लागला.राहटी बंधाºयात पाणी दाखल झाले खरे; परंतु, बंधाºयाचे गेट नादुरुस्त झाल्याने बंधाºयात आलेले अर्ध्याहून अधिक पाणी वाया गेले. पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणामुळे बंधाºयातील पाणी वाहून गेल्याने या अधिकाºयांनी तातडीने दुरुस्ती केली. परंतु, शहरवासियांसाठी केवळ अर्धेच पाणी शिल्लक राहिले. त्यानंतर १५ ते २० दिवसातच शहराला पाणीपुरवठा करणाºया राहटी बंधाºयातील पाण्याने तळ गाठण्यास सुरुवात केली. आज मात्र हा बंधारा कोरडाठाक पडला आहे.उन्हाळ्यात पाण्यासाठी धावपळ होणे सहाजीक आहे; परंतु, हिवाळ्यातच शहरवासियांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.बंधाºयातील पाणीसाठा कमी होत असताना पाणी उपलब्ध करुन घेण्यासंदर्भात महापालिकेकडून पाठपुरावा झाला नाही. बंधाºयातील पाणी संपण्यापूर्वीच या बंधाºयात पाणीसाठा करण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक होते. परंतु, हे उपाय करताना महापालिका प्रशासन कमी पडले. सोमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास हा बंधारा पूर्णत: कोरडा झाला आहे. त्यामुळे बंधाºयातून पाणी उपसा करणारे विद्युतपंप दिवसभर बंद राहिले. परिणामी मंगळवारपासून शहरवासियांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.पाटबंधारे विभागाने दिला नकारराहटी बंधाºयात यापूर्वी दाखल झालेले पाणी पाटबंधारे विभागाच्या चुकीमुळे वाहून गेले होते. त्यामुळे सिद्धेश्वर येथून हे पाणी पुन्हा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी पाटबंधारे विभागाची आहे. महानगरपालिकेने ही बाब जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार १५ दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाºयांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांना पत्र पाठवून वाहून गेलेल्या १ दलघमी पाण्याची मागणी केली. मात्र या विभागाने पाणीसाठा उपलब्ध नाही, असे कारण देऊन असमर्थता दर्शविली.निम्न दुधनाकडेही पाठपुरावापाटबंधारे विभागाने सिद्धेश्वर प्रकल्पातून पाणी देण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पातून राहटी बंधाºयासाठी पाणी घेण्याचा पर्याय उपलब्ध होता. त्यासाठी महापालिकेने जिल्हाधिकाºयांकडे तशी मागणी नोंदविली. जिल्हाधिकाºयांनीही औरंगाबाद येथे या संदर्भात पत्र व्यवहार केल्याचे सांगण्यात आले.परंतु, राहटी बंधाºयातील पाणी संपले तरीही पर्यायी व्यवस्था झाली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे परभणीकरांना पाण्यासाठी धावपळ करावी लागते की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे.पाणीप्रश्नाकडे डोळेझाकशहरामध्ये मुलभूत सुविधा पुरविण्यासही मनपा प्रशासन कमी पडत आहे. अशी परिस्थिती असताना घरपट्टी, पाणीपट्टी दरवाढ केली जात आहे. एकीकडे सुविधा नाहीत, तर दुसरीकडे दरवाढ होत असल्याने नागरिकांत संतापाचे वातावरण आहे. शहरासाठी पाणी उपलब्ध करणे ही मनपा प्रशासनाची जबाबदारी आहे; परंतु, प्रशासनाने पाणीप्रश्नाकडे डोळेझाक केल्याचे दिसत आहे. महापालिकेने शहरासाठी पाणी उपलब्ध व्हावे म्हणून पत्र व्यवहार केला ही असेल. परंतु, मनपाचा पाठपुरावा कमी पडल्यानेच शहरवासियांना टंचाईचे चटके सोसावे लागणार आहेत.