शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

४ रुपयांचा मास्क विकला जातोय १० रुपयांना ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 19:25 IST

कोरोनाच्या संसर्गानंतर मास्क आणि सॅनिटायझरचा समावेश जीवनावश्यक वस्तूंमध्ये करण्यात आला आहे.

ठळक मुद्देएन.95 मास्कची शहरी भागात शासकीय दरानेच विक्री

परभणी: शहरातील औषधी दुकानांमध्ये एन. ९५ मास्कची शासकीय दराने विक्री होत असली तरी दोन पदरी आणि तीन पदरी मास्क दुपटीपेक्षा अधिक दराने विक्री केला जात आहे. ग्रामीण भागात मात्र एन ९५ मास्कही चढ्या दराने विक्री होत असल्याची बाब सोमवारी केलेल्या पाहणीत दिसून आली.

कोरोनाच्या संसर्गानंतर मास्क आणि सॅनिटायझरचा समावेश जीवनावश्यक वस्तूंमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही वस्तूंच्या दरांवर शासनाचे नियंत्रण आले आहे. काही दिवसांपूर्वी शासनाने मास्कचे दर जाहीर केले. या पार्श्वभूमीवर शहरातील औषधी दुकानांची पाहणी केली असता एन ९५ मास्क शासकीय दरानुसार विक्री होत असल्याची बाब समोर आली. मात्र दुपदरी आणि तीन पदरी मास्कच्या किंमती दुपटीपेक्षा अधिक असल्याचे पाहणीत दिसून आले.  त्याचप्रमाणे अनेक औषधी दुकानदारांनी दुपदरी व तीनपदरी मास्क ठेवणे बंद केले आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून मास्कच्या दरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी तपासण्या करण्याची गरज निर्माण झाली आहे.

सोमवारी सकाळी ११ ते दुपारी १२ या एक तासात शहरातील विविध भागात मास्कच्या दरांची माहिती घेतली असता दुपदरी आणि तीन पदरी मास्कच्या  किंमती अधिक असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे भेट दिलेल्या एकाही औषध विक्रीच्या केंद्रावर शासनाने निश्चित केलेल्या दरांची माहिती दर्शनी भागात लावलेली नव्हती. त्यामुळे नागरिकांनाही शासकीय दराची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. सायंकाळच्या सुमारास पाथरी शहर आणि गंगाखेड शहरात या मास्कच्या दराची पाहणी केली असता दोन शहरात एन. ९५ मास्क चढ्या दराने विक्री होत असल्याचे पाहणीत दिसून आले. दुपदरी व तीन पदरी मास्कही १० रुपये या दराने विक्री झाल्याचे या पाहणीत निष्पन्न झाले.

चार मास्कची एकत्रित विक्रीपरभणी शहरातील बसस्थानक परिसरातील एका औषधी दुकानात एन-९५ मास्कच्या दरांची विचारणा केली असता चार मास्क २०० रुपयांना असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात एन ९५ चे दर १९ रुपयांपासून ते ४९ रुपयांपर्यंत निश्चित केले असले तरी प्रति मास्क एक रुपया अधिक घेतला जात आहे. शिवाय चार मास्क एकत्रित विक्री होत असल्याचे दिसून आले. 

गंगाखेडमध्ये चढ्या दराने विक्रीगंगाखेड शहरातील दिलकश चौक भागातील औषधी दुकानांवर एन-९५ मास्क ६० रुपयांपासून ते २५० रुपयांपर्यंत विक्री होत होते. तसेच याच भागातील एका दुकानावर दुपदरी व तीनपदरी मास्कच्या दरांचा फलक दर्शनी भागात लावलेला होता. तर इतर दुकानांवर हेच मास्क १० रुपयांना विक्री केले जात होते. त्यामुळे मास्कच्या दरात शहरात भिन्नता दिसून आली.

पाथरीत 10 रुपयांना मास्कपाथरी शहरातील ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या औषधी दुकानांमध्ये ८० रुपयांना एन ९५ मास्क विक्री होत होते. त्याचप्रमाणे दुपदरी आणि तीन पदरी मास्क प्रत्येकी १० रुपयांना विक्री होत असल्याचे पाहणीत दिसून आले. विशेष म्हणजे, एकाही दुकानावर शासकीय दर लावलेले नव्हते. त्यामुळे चढ्या दराने मास्कची विक्री होत असल्याचे स्पष्ट झाले.

जिल्ह्यात तपासणीचा अभावशासनाने मास्कचे दर जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात या दराने मास्कची विक्री होते का? याची पाहणी झाली नसल्याने अनेक भागात दरांमध्ये तफावत दिसत आहे. या संदर्भात अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांचा फोन बंद असल्याने तपासणीची माहिती मिळू शकली नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याparabhaniपरभणी