साखला प्लॉट भागातून नवामोंढा येथे जाणारा मुख्य रस्ता बंद करण्यात आला आहे. या भागात नेहमी अपघात होत असल्याने हा रस्ता बंद करण्यात आल्याची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक यांनी दिली, असे स्वाभिमानी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, साखला प्लॉट, ज्ञानेश्वरनगर, माऊलीनगर, उदयनगर, गंगाखेड नाका आदी भागातील शेतकऱ्यांना मोंढ्यात जाण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे. तेव्हा हा मुख्य रस्ता मोकळा करून द्यावा तसेच या ठिकाणी दिवसभर उभी राहणारी खासगी वाहने इतर ठिकाणी स्थलांतरित करावीत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे किशोर ढगे, डिगंबर पवार, भास्कर खटिंग, गजानन तुरे, शेख जाफर, उस्मान अन्सारी, शेख आयुब, सय्यद इसामोद्दीन, शेख मुजाहिद आदींनी केली आहे.
उड्डाणपुलाखालून मोंढ्याकडे जाणारा रस्ता केला बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:21 IST