शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक :रोहयोची कामे न करणाऱ्यांना निलंबित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 00:27 IST

दुष्काळी परिस्थितीमुळे जनतेतून कामांची मागणी होत असताना ही कामे सुरु न करणाºया ग्रामसेवक व अन्य कर्मचाºयांना निलंबित करा व प्रतिसाद न देणाºया सरपंचांच्या बडतर्फीचे प्रस्ताव सादर करा, असे आदेश विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी मंगळवारी येथे आयोजित आढावा बैठकीत दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दुष्काळी परिस्थितीमुळे जनतेतून कामांची मागणी होत असताना ही कामे सुरु न करणाºया ग्रामसेवक व अन्य कर्मचाºयांना निलंबित करा व प्रतिसाद न देणाºया सरपंचांच्या बडतर्फीचे प्रस्ताव सादर करा, असे आदेश विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी मंगळवारी येथे आयोजित आढावा बैठकीत दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी अधिकाºयांची आढावा बैठक घेतली. या बैठकीस अप्पर विभागीय आयुक्त विजयकुमार फड, जिल्हाधिकारी पी. शिव शंकर, सीईओं बी.पी.पृथ्वीराज, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्यासह विविध विभागांच्या अधिकाºयांची उपस्थिती होती. यावेळी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचा विषय चर्चेला आला. त्यावेळी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे लोकांकडून कामांची मागणी केली जात आहे.या संदर्भात वृत्तपत्रांमध्ये बातम्या येत आहेत. लोकप्रतिनिधी, पत्रकार आम्हाला प्रश्न विचारत आहेत. तुम्ही काय करीत आहात, असा सवाल यावेळी भापकर यांनी केला. एप्रिल महिन्यापासून जवळपास २० हजार विहिरींचे प्रस्ताव दाखल आहेत. त्यातील बहुतांश कामे सुरुच नाहीत. किमान ७ हजार विहिरींची कामे उन्हाळ्यामध्ये होणे अपेक्षित आहे.रोहयोची कामे ग्रामपातळीवर सुरु न करणाºया ग्रामसेवकांना निलंबित करा व निष्क्रियता दाखविणाºया सरपंचांच्या बडतर्फीचा प्रस्ताव सादर करा, असे आदेशही यावेळी भापकर यांनी यावेळी दिले. ३० आॅक्टोबर रोजी राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यावेळेसपासून आतापर्यंत रोहयोची कामे सुरु करण्यासंदर्भात का उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, याचा जाब यावेळी भापकर यांनी उपस्थित अधिकाºयांना विचारला. यातील कामचुकारपणा खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड इशाराही त्यांनी यावेळी दिला.कृषी अधीक्षक कुठे गायब होतात ?४या आढावा बैठकीत भापकर यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त केली. ते जनतेला भेटत नाहीत, अधिकाºयांच्या बैठकीला येत नाहीत, आजच्या बैठकीलाही उपस्थित नाहीत, ते नेमके असतात कुठे, असा सवाल यावेळी भापकर यांनी केला. जेथे आवश्यकता आहे तेथे तातडीने पाण्याचे टँकर सुरु करा व गरजेनुसार चाºयाची उपलब्धता करुन द्या, असेही यावेळी भापकर म्हणाले.

टॅग्स :parabhaniपरभणीcollectorजिल्हाधिकारी