दोन दिवसांपूर्वी परभणी शहर व परिसरात झालेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्याची सुरुवात केली असून, विमा भरण्याची अंतिम मुदत दिली आहे. ११ जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. ऑनलाईन तक्रार नोंदवणे शक्य नाही, अशा शेतकऱ्यांनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीच्या जिल्हा, तालुका कार्यालयात आवश्यक त्या कागदपत्रांसह ७२ तासांच्या आत तक्रारीची नोंद करणे आवश्यक आहे. सध्या पिकाचे नुकसान हे अतिवृष्टीमुळे झालेले असल्याने अतिवृष्टी हेच कारण नमूद करून नुकसानीची माहिती देणे आवश्यक आहे. नुकताच पेरण्या होऊन काही पिकांची उगवण सुरू झाली असून, काही ठिकाणी पीकवाढीच्या अवस्थेत आहेत हे लक्षात घेऊन स्थानिक आपत्ती अंतर्गत जोखमीचा धोका घडेपर्यंत पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना पिकाच्या लागवडीसाठी झालेल्या निविष्ठांच्या खर्चाच्या प्रमाणात नुकसानभरपाई मंजूर करण्यात येते. तेव्हा नुकसानक्षेत्राची तक्रार विमा कंपनीकडे नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अतिवृष्टीने नुकसान झाल्यास तक्रार नोंदवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:13 IST