१०० फूट रुंदीच्या या रस्त्यावर अनेक अतिक्रमणे झाली असून, जलवाहिनी अंथरण्याच्या कामात अडथळा येत असल्याने मनपा प्रशासनाने अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. शनिवारी सकाळी १० वाजतापासून या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. पाच जेसीबी मशीन, एक पोकलॅण्ड, एक रोलर, विद्युत तारा काढण्यासाठी मनपाचे क्रेन, तीन ट्रॅक्टर, एक टिप्परच्या साह्याने अतिक्रमणे काढण्यात आले. मनपा आयुक्त देवीदास पवार यांच्या आदेशावरून ही मोहीम राबविली जात आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत ४० अतिक्रमणे काढण्यात आली. दरम्यान, स्वत:हून अतिक्रमणे काढण्यासाठी एक दिवसाची मुदत देण्यात आली असून, रविवारी ही मोहीम बंद ठेवली जाणार आहे. सोमवारी सकाळपासून पुन्हा मोहीम राबविली जाणार असल्याचे मनपाने स्पष्ट केले.
शहर अभियंता वसीम पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी रस्त्याचे मोजमाप केले जाणार आहे. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूचे झाडे तोडण्यात येणार असून जलवाहिनी अंथरून मुरूम टाकण्यात येणार आहे, अशी माहिती सहायक आयुक्त श्रीकांत कांबळे यांनी दिली. पथक प्रमुख प्रदीप जगताप, देवीदास जाधव, महेश गायकवाड, शहर अभियंता वसीम पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक नगररचनाकार किरण फुटाणे, रईस खान, आरेस खान, सहायक आयुक्त श्रीकांत कांबळे, संतोष वाघमारे, मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, लक्ष्मण जोगदंड, शेख शादाब, नयनरत्न घुगे, मेहराज अहेमद, श्रीकांत कुऱ्हा, लाइट विभागाचे प्रमुख सोहेल, उद्यान विभागाचे प्रमुख पवन देशमुख, उपअभियंता सुधीर तेहरा, हेमंत दापकेकर, नीलेश भंडे, संतोष लोंढे, प्रवीण हटकर, शेख अर्शद, अथर खान आदींचा पथकात समावेश आहे. शहरातील नागरिकांनी आपल्या परिसरातील अतिक्रमण काढून घ्यावे, महापालिका कोणत्याही क्षणी अतिक्रमण काढणार असल्याचे आयुक्त देवीदास पवार यांनी स्पष्ट केले आहे.