शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर रेशन दुकानदारांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:10 IST

तामिळनाडू शासनाप्रमाणे अन्न महामंडळ स्थापन करून परवानाधारक रेशनदुकानदारांना त्यात समाविष्ट करावे व शासकीय सुविधा द्याव्यात, यासह इतर मागण्यांसाठी जिल्ह्यातील रेशनदुकानदारांनी २१ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : तामिळनाडू शासनाप्रमाणे अन्न महामंडळ स्थापन करून परवानाधारक रेशनदुकानदारांना त्यात समाविष्ट करावे व शासकीय सुविधा द्याव्यात, यासह इतर मागण्यांसाठी जिल्ह्यातील रेशनदुकानदारांनी २१ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला़परभणी जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार व हॉकर्स, किरकोळ केरोसीन परवानाधारक संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले़ बुधवारी दुपारी १़३० वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यातील रेशनदुकानदारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढला़ रेशनदुकानदारांचे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत़ ई-पॉस मशीनद्वारे धान्य वितरण करताना अडचणी येत आहेत़ या सर्व मुद्यांवर मोर्चाद्वारे आवाज उठविण्यात आला़ मोर्चानंतर जिल्हाधिकाºयांना १७ मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले़ त्यात परवानाधारकास महागाई निर्देशाकांनुसार मानधन किंवा पगार द्यावा, शालेय पोषण आहाराची वाहतूक व कमीशनची रक्कम अनेक वर्षांपासून थकली आहे़ ती अदा करावी, परवानाधारकांनी धान्यासाठी रक्कम भरली; परंतु, धान्य कोटा उपलब्ध न झाल्याने ही रक्कम शासनाकडे थकीत आहे़ ती त्वरित द्यावी, परवानाधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करावेत यासह इतर मागण्यांचा यात समावेश आहे़ या आंदोलनात जिल्ह्यातील रेशनदुकानदार, केरोसीन परवानाधारक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़