परभणी : पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राणी मुंजाजी पिसाळ तर उपसरपंचपदी उर्मिला रावसाहेब काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या ग्रामपंचायतीत रायुकाँचे जिल्हाध्यक्ष रितेश काळे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने वर्चस्व मिळवले आहे. दिनांक ८ फेब्रुवारी रोजी सरपंच व उपसरपंच पदासाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने पीठासन अधिकारी डी. व्ही. कोकाटे यांनी सरपंच व उपसरपंचांची निवड बिनविरोध झाल्याचे घोषित केले. यावेळी ग्रामविकास अधिकारी एस. के. पवार यांनी सहकार्य केले. या निवडीनंतर नूतन सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विठ्ठल कापुरे, संजना पंडित, दीपाली धायजे, ओमप्रकाश काळे, लक्ष्मीबाई गजलवाड, लोचना काळे, नरहरी मानकरी, प्रियंका काळे, डॉ. सखाराम काळे आदी उपस्थित होते.
एरंडेश्वरच्या सरपंचपदी राणी पिसाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:15 IST