शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

घरपट्टी वाढीच्या निषेधार्थ शिवसेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 16:22 IST

महानगरपालिकेने केलेल्या अन्यायकारक घरपट्टी आणि मालमत्ता कर वाढीच्या विरोधात सोमवारी शिवसेनेच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. भव्य स्वरूप प्राप्त झालेल्या या मोर्चात शिवसैनिकांसह शहरातील नागरिक, व्यापारी यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी होते.

परभणी, दि. 11 :  महानगरपालिकेने केलेल्या अन्यायकारक घरपट्टी आणि मालमत्ता कर वाढीच्या विरोधात सोमवारी शिवसेनेच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. भव्य स्वरूप प्राप्त झालेल्या या मोर्चात शिवसैनिकांसह शहरातील नागरिक, व्यापारी यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी होते.

परभणी महापालिकेने घरपट्टीत वाढ केली असून त्याच्या वसुलीच्या नोटिसाही नागरिकांनी बजावल्या आहेत. अनेकांना पूर्वीच्या घरपट्टीच्या तुलनेत ३० ते ४० टक्के वाढीव घरपट्टी लादण्यात आली. अचानक झालेल्या या वाढीचा नागरिकांमधून  संताप व्यक्त करण्यात येत होता.  यामुळे शिवसेनेतर्फे  खा. बंडू जाधव व आ. डॉ. राहुल पाटील यांनी  मोर्चाचे आयोजन केले. दुपारी १२ वाजता शहरातील शनिवार बाजार येथून मोर्चाला प्रारंभ झाला. महापालिकेच्या करवाढी विरोधात घोषणा देत हा मोर्चा शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, अष्टभुजा देवी मंदिर, नारायण चाळ, विसावा कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोंचला. तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.

यावेळी सहसंपर्क प्रमुख डॉ. विवेक नावंदर, महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख विद्या सरपोतदार, जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आणेराव, डॉ. संजय कछवे, माजी आ. मीराताई रेंगे, माजी विरोधी पक्ष नेत्या अंबिका डहाळे, व्यापारी महासंघाचे सूर्यकांत हाके, नगरसेवक सचिन अंबिलवादे, रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे, रिपाइंचे राज्य उपाध्यक्ष डी.एन. दाभाडे, गाळेधारक संघटनेचे चंद्रकांत डहाळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. व्यापारी महासंघ, रिपब्लिकन सेना, रिपाइं यांच्यासह शहरातील जवळपास ५० संघटनांनी या मोर्चास पाठिंबा दिला.