शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पंचनामा करताना ग्रामसेवकाकडून महिलेस जातीयवाचक शिवीगाळ; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 19:31 IST

परिसरात 130 मिमी पाऊस पडल्याने पुराचे पाणी हादगाव बुद्रुक गावात शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.

पाथरी : अतिवृष्टीमुळे घरात पाणी शिरून झालेल्या नूकसानीचा पंचनामा करत असताना ग्रामसेवकाने दोन हजार रुपयांची मागणी करत जातीयवाचक शिविगाळ केल्याची तक्रार एका महिलेने दिल्यानंतर  गुरुवारी रात्री 11.45 वाजता ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक सप्टेंबर रोजी हदगाव बुद्रुक गावात पंचनामा करत असताना ही घटना घडली.

पाथरी तालुक्यात मंगळवारी पहाटे मुसळधार पाऊस पडला. परिसरात 130 मिमी पाऊस पडल्याने पुराचे पाणी हादगाव बुद्रुक गावात शिरले. त्यामुळे येथील इंदिरानगर वसाहतीतील जवळपास दोनशे घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले अतिवृष्टी झाल्यानंतर तहसीलदारांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार 1 सप्टेंबरपासून मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांच्याकडून हादगाव बुद्रुक येथे नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली.

पंचनामा करताना ग्रामसेवक कुलदिप फंड याने सीताबाई मारोती लालझरे या महिलेस 2000 रुपयांची  मागणी केली. एवढ्यावर न थांबता फंड याने महिलेस जातीवाचक शिवीगाळ केली. याबाबत महिलेने पाथरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून ग्रामसेवक कुलदिप फंड याच्या विरुद्ध पाथरी पोलीस ठाण्यात 2 सप्टेंबर रोजी रात्री 11.45 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास  सेलूचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रवण दत्त करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी