शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

३० सप्टेंबरपर्यंतचा कोटा फुल्ल, लायसन्स बाद होण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:21 IST

परभणी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात मागील ३ महिन्यांपासून शनिवारी तसेच रविवारी सुटीच्या दिवशी विशेष कॅम्प घेऊन विविध कामांसाठी अर्ज ...

परभणी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात मागील ३ महिन्यांपासून शनिवारी तसेच रविवारी सुटीच्या दिवशी विशेष कॅम्प घेऊन विविध कामांसाठी अर्ज दाखल केलेल्यांना परवाना तसेच प्रमाणपत्र देण्यासाठी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मागील ३ महिन्यांत ६ हजार जणांच्या चाचणी करण्यात आल्या तरी अजून ८ ते १० हजार अर्ज प्रलंबित आहेत. यामुळे अनेकांचे लायसन्स रद्द होऊ शकते. यामुळे अनेकांचा श्रम, वेळ आणि पैसा या तिन्ही बाबी वाया जाऊ शकतात. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सर्वसामान्य नागरिक, अर्जदार खेटे मारून वाहन परवाना व अन्य प्रमाणपत्र मिळविण्यासाठी चौकशी व गर्दी करीत आहेत.

काय आहेत अडचणी

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने त्यांच्या अखत्यारित ऑनलाईन अर्ज केल्यानंतर या सर्व अर्जदारांची चाचणी आणि परीक्षा घेण्याची प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या विभागाकडे असलेले मनुष्यबळ कमी व अपुरे पडत आहे. १२ मोटार वाहन निरीक्षकांपैकी सध्या ५ जण कार्यरत आहेत, तर ६ जागा रिक्त आहेत. एक मोटार वाहन निरीक्षक पनवेल येथे बदलीवर कार्यरत आहेत. यामुळे मोटार वाहन निरीक्षकाच्या उपलब्धतेप्रमाणे ही प्रक्रिया पूर्ण केली जात आहे.

रोजचा कोटा ७० चा

सध्या ऑनलाईन अर्ज केलेल्यांसह ऑफलाईन अर्ज केले, त्यांचा दररोज कमीत कमी ७० जणांचा कोटा निश्चित केला आहे. यानुसार महिन्याकाठी २१०० ते २२०० लायसन्स पूर्ण होत आहेत तसेच कॅम्पद्वारे १०० जणांची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे.

तारीख मिळालेले येत नाहीत, येणाऱ्यांना तारीख मिळत नाही

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडे वैयक्तिक ऑनलाईनरीत्या अर्ज केल्यानंतर तारीख मिळाल्यावर १० टक्के अर्जदार हे गैरहजर राहतात. उर्वरित ९० टक्के अर्जदार त्या तारखेला सर्व प्रक्रिया पूर्ण करतात. मात्र, ऑफलाईनरीत्या येणाऱ्यांना तारीख मिळत नसल्याचे अनेक जण सांगत आहेत. काही जणांना मागील दोन महिन्यांपासून तारीख मिळाली नाही.

दैनंदिन दिलेला कोटा आणि त्याव्यतिरिक्त कॅम्पमध्ये दिलेल्या चाचणीच्या उपलब्धतेनुसार नियोजन केले जात आहे. याचा नागरिकांनी व अर्जदारांनी लाभ घ्यावा.

- श्रीकृष्ण नकाते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.

लायसन्स नव्याने काढावे लागणार की काय?

मी दुचाकीचा लर्निंग परवाना काढला आहे. यानंतर कायमस्वरूपी परवान्यासाठी अर्ज आणि पैसे भरले आहेत. मात्र, तारीख मिळाली नसल्याने प्रतीक्षेत आहे.

- भारत निंबाळकर, अर्जदार.

मला दोन महिन्यांपासून पैसे भरूनही अद्याप तारीख मिळाली नाही. यामुळे पैसे वाया जाण्याची भीती आहे. पुन्हा तीच प्रक्रिया करण्यास वेळ लागतो.

- विष्णू कुटे, अर्जदार.