शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने; छत्रपती संभाजीनगरात राडा
2
Arvind Kejriwal Pakistan: अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेवर थेट पाकिस्तानकडून आली प्रतिक्रिया, काय म्हणाले फवाद चौधरी?
3
रवींद्र धंगेकरांचा भाजपावर गंभीर आरोप, म्हणाले, ‘पुण्यात पैशांचे ट्रक आलेत, आज फडणवीस वाटप करतील’
4
प्रज्वल रेवण्णा प्रकरण उघडकीस आणणारा भाजपा नेता अडचणीत, पोलिसांनी केली अटक, समोर आलं असं कारण   
5
'दिल्लीत बोलवून फाईल दाखवली अन्...'; भाजप प्रचाराचे कारण सांगत काँग्रेसची राज ठाकरेंवर टीका
6
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
7
"राहुल गांधी हे 'रणछोड दास'; जे स्वत: निवडणूक जिंकू शकत नाही, ते आपल्या पक्षाला..."
8
खळबळजनक ! नोटांनी भरलेला 'छोटा हाथी' वाहन पलटी; रस्त्यावर पडले तब्बल ७ कोटी
9
Mumbai Pali Hill Fire: मुंबईच्या पाली हिलमध्ये अग्नितांडव, थरकाप उडवणारा स्फोट; व्हिडिओ व्हायरल!
10
नरहरी झिरवाळ यांच्या 'त्या' फोटोमागचं सत्य भलेतच; खुद्द झिरवाळांनी केला खुलासा
11
खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगकडे केवळ १ हजार रुपयांची संपत्ती, एवढं झालंय शिक्षण, शपथपत्रातून समोर आली माहिती
12
स्टार प्रवाहवरील ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! काही मालिकांची वेळही बदलली
13
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबचे वाढदिवशी नव्या घरात गृहप्रवेश, व्हिडीओ आला समोर
14
Bank Of Baroda : ₹७.१६ डिविडंड, ₹४८८६ कोटींचा नफा; तुमच्याकडे आहे का 'या' सरकारी बँकेचा शेअर?
15
समोरासमोर या, विकासावर होऊ दे चर्चा; मिहिर कोटेचा यांचं संजय दिना पाटलांना आव्हान
16
खळबळजनक! दहावी नापास सफाई कर्मचाऱ्याने उघडलं हॉस्पिटल; 'असा' झाला पर्दाफाश
17
Adah Sharma : अदा शर्माचं शिक्षण किती?, जगतेय आलिशान आयुष्य; कोट्यवधींची मालकीण, जाणून घ्या, नेटवर्थ
18
फोक्सवॅगन टायगून! 350 किमी चालविली, 1.0 लीटरचे इंजिन, वजनदार... मायलेजने चकीत केले
19
बहिणीचा व्हिडिओ पाहून माधुरी भावूक, 'डान्स दिवाने'मध्ये साजरा झाला 'धकधक गर्ल' चा वाढदिवस
20
२८,२०० मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्याचे आदेश, २० लाख नंबर्सचं पुन्हा होणार व्हेरिफिकेशन; कारण काय?

'गलिच्छ राजकारणासह शासनाचा निषेध'; जिल्हाधिकाऱ्यांना रूजू करून न घेतल्याने परभणीकरांचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2021 3:56 PM

IAS Aanchal Goel : राजकीय दबावापोटी महिला आय.ए.एस. अधिकारी आंचल गोयल यांना पदभार घेण्यापासून रोखले गेले. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी

ठळक मुद्देजिल्हाधिकारी पदी आंचल गोयल रुजू होऊ नयेत, यासाठी राजकारण्यांनी कुटील डाव रचला,त्यांनी पदभार घेतला असता तर कोणाचे हितसंबंध धोक्यात येणार होते?

परभणी : नूतन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांना रुजू करुन न घेताच परत बोलावल्याच्या प्रकरणानंतर सर्वसामान्य नागरिकांतून तीव्र संतापजनक प्रतिक्रिया उमटत असून, सोमवारी जागरुक नागरिक आघाडीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करीत गलिच्छ राजकारणासह शासनाच्या धोरणाचा कडाडून निषेध नोंदविण्यात आला. ( Anger of Parbhanikar for not approving the Collector Aanchal Goel) 

जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर हे ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त होणार असल्याने त्यांच्या जागी आंचल गोयल या आयएएस असलेल्या महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली. विशेष म्हणजे रुजू होण्यासाठी आंचल गोयल पाच दिवसांपूर्वीच परभणीत दाखल झाल्या. मात्र ऐन सेवानिवृत्तीच्या दिवशीच त्यांना रुजू न करुन न घेता, परत बोलावण्यात आले. जिल्हाधिकारी पदाचा पदभार अप्पर जिल्हाधिकारी राजेश काटकर यांच्याकडे देण्यात आला. या सर्व प्रकरणानंतर परभणीत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. जिल्हाधिकारी पदी आंचल गोयल रुजू होऊ नयेत, यासाठी राजकारण्यांनी कुटील डाव रचला, त्यांनी पदभार घेतला असता तर कोणाचे हितसंबंध धोक्यात येणार होते? कोणाला त्यांची अडचण होती? एक महिला अधिकारी ८ महिन्यांचे लेकरु घेऊन पदभार घेण्यासाठी येते आणि सर्व प्रस्थापित पक्षांचे नेते मंडळी साटेलोटे करणाऱ्या अधिकाऱ्यांशी संगनमत करुन ती महिला पदभार कसा घेणार नाही, यासाठी डावपेच रचतात, ही गोष्ट परभणीकरांनी आंदोलनातून व्यक्त केला संताप.

लांच्छनास्पद आहे, त्याचा निषेध नोंदविण्यात आला.सर्वसामान्य नागरिकांचा हाच संताप सोमवारी जागरुक नागरिक आघाडीच्या निदर्शने आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त झाला. २ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात आले. आंचल गोयल यांना सन्मानाने पदभार द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. माधुरी क्षीरसागर, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम, सुभाष जावळे, सुभाष बाकळे, माणिक कदम, संतोष आसेगावकर, राजन क्षीरसागर, गणपत भिसे, नितीन देशमुख, प्रसाद देवके, दिनेश नरवाडकर, संजय शेळके, श्रीकांत हराळे, डॉ.धर्मराज चव्हाण, अच्युत रसाळ, दत्तराव पवार, सुभाष पांचाळ यांच्यासह सर्वसामान्य नागरिक या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनानंतर जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.

अस्वस्थ नेत्यांचे प्रयत्न यशस्वी; परभणीच्या नूतन जिल्हाधिकाऱ्यांची पदभार स्वीकारण्यापूर्वीच नियुक्ती रद्द

आंदोलनातून केलेल्या मागण्याराजकीय दबावापोटी महिला आय.ए.एस. अधिकारी आंचल गोयल यांना पदभार घेण्यापासून रोखले गेले. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, जबाबदार असणाऱ्याविरुद्ध कारवाई करावी, आंचल गोयल यांना सन्मानाने पदभार द्यावा, बेकादेशीर कृत्यासाठी प्रशासनात ढवळाढवळ करणाऱ्यांना दूर करा, भ्रष्ट व जनतेप्रती उत्तरदायित्व नसणाऱ्या प्रशासनातील सर्व स्तरातील अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. 

टॅग्स :parabhaniपरभणीParabhani collector officeजिल्हाधिकारी कार्यालय परभणी