शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

दोन १३२ केव्ही केंद्रांचा प्रस्ताव धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:16 IST

परभणी जिल्ह्याला औष्णिक विद्युत केंद्रातून वीज पुरवठा होतो. उपलब्ध झालेली वीज उपकेंद्रांच्या क्षमतेप्रमाणे वहनांद्वारे वितरित करण्याचे महत्त्वाचे काम १३२ ...

परभणी जिल्ह्याला औष्णिक विद्युत केंद्रातून वीज पुरवठा होतो. उपलब्ध झालेली वीज उपकेंद्रांच्या क्षमतेप्रमाणे वहनांद्वारे वितरित करण्याचे महत्त्वाचे काम १३२ केव्ही केंद्रांमधून केले जाते. परभणी जिल्ह्यात सद्यस्थितीला असे सहा केंद्र उपलब्ध आहेत. परभणी, जिंतूर, सोनपेठ, पूर्णा, पाथरी आणि गंगाखेड येथून या केंद्राच्या माध्यमातून वीज वितरण व्यवस्था राबविली जाते. परंतु, मागील काही वर्षांच्या तुलनेत जिल्ह्यातील वीज ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सद्यस्थितीला कृषी, घरगुती, औद्योगिक आणि वाणिज्य अशा चार गटांमध्ये २ लाख ८० हजार वीज ग्राहक विजेचा वापर करतात. या ग्राहकांना वीज पुरवठा करताना महावितरणला मात्र तारेवरची कसरत करावी लागत आहे. केंद्र आणि राज्य शासनामार्फत प्रत्येकाच्या घरी वीज जोडणी देण्याच्या योजना आखल्या जात आहेत. सौभाग्य योजनेच्या माध्यमातून वीज ग्राहकांसाठी महावितरणने वीज जोडणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. एकीकडे खेडोपाडी वीज पुरवण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च केला जात असताना दुसरीकडे साधन सामग्री वाढविण्यासाठी मात्र प्रशासनाचे प्रयत्न तोकडे पडत आहेत. परभणी जिल्ह्यामध्ये सहा १३२ केव्ही केंद्र आणि ३३ केव्हीची ७८ उपकेंद्र आहेत. या केंद्रांमधून ग्राहकांपर्यंत विजेचे वितरण केले जाते. परंतु, जिल्ह्यातील विजेची मागणी लक्षात घेता १३२ केव्ही वीज केंद्राची संख्या अपुरी पडत आहे. या केंद्रांमधून वीज वितरण करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. विजेचा दाब कमी- अधिक होतो. परिणामी वीज पुरवठा विसकळीत होण्याचे प्रमाण वाढत जाते. ग्राहकांना सुरळीत वीज मिळत नसल्याने ओरड वाढत चालली आहे. मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्यात विजेच्या संदर्भात ग्राहकांच्या तक्रारी असतानाही प्रशासनाकडून मात्र ठोस पावले उचलली जात नाहीत. परिणामी जिल्ह्यामध्ये ग्राहकांना वीज पुरवठा होत नसल्याचे दिसत आहे. वीज वितरण कार्यालयाकडून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आलेला प्रस्ताव मंजूर झाल्यास जिल्ह्यात वीज वितरण व्यवस्था सुरळीत होण्याची शक्यता आहे.

मागणी वाढल्याने यंत्रणेवर ताण

मागील काही वर्षांच्या तुलनेत विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वीज ग्राहकांची संख्या तर वाढलीच आहे. याशिवाय ग्राहकांकडून विजेचा वापरही दुपटीने वाढला आहे. काही कामे विजेशिवाय होत नसल्याने दिवसेंदिवस विजेची मागणी वाढत चालली आहे. ग्राहकांची ही मागणी पुरवणारी यंत्रणा मात्र जुनीच आहे. या यंत्रणेत सुधारणा करणे आवश्यक असताना वेळोवेळी ही सुधारणा झाली नाही. मागणीच्या तुलनेत यंत्रणा वाढविणे आवश्यक होते. परंतु, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने वीज वितरणावर ताण येत आहे.