शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

कार्यक्रम प्रशासनाचा, जुंपली ग्रामस्थांमध्ये; पेडगाव येथील प्रकार

By मारोती जुंबडे | Updated: December 17, 2023 18:28 IST

अधिकारी आल्या पावली परतले

परभणी: विकसित भारत संकल्प यात्रा अभियान अंतर्गत पेडगाव येथे प्रशासनाकडून कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात आली. रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास प्रशासन लवाजम्यासह गावात धडकले. महिलांसह ग्रामस्थ ही मोठ्या संख्येने कार्यक्रमास्थळी जमा झाले. मात्र स्थानिक ग्रामस्थांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर धक्काबुकीत झाल्याने गोंधळ वाढला, अखेर हा कार्यक्रम रद्द करून प्रशासन आल्यापावली शहराकडे परतले. त्यामुळे कार्यक्रम प्रशासनाचा अन् जुंपली ग्रामस्थांमध्ये असाच काहीसा प्रकार पेडगाव येथे रविवारी घडला.

विविध योजना अंतर्गत पात्र असलेले परंतु लाभ न मिळालेल्या वंचित नागरिकांपर्यंत लाभ पोहोचविण्याच्या उद्देशाने केंद्र शासनामार्फत विकसित भारत संकल्प यात्रेचे परभणी जिल्ह्यात २४ नोव्हेंबर २०२३ ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या संकल्प यात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीत जाऊन लाभ न मिळालेल्या वंचित नागरिकांना लाभ देण्यात येत आहे. या अनुषंगाने तालुका प्रशासनाने ही जोरदार तयारी केली आहे. तालुका प्रशासनाच्या वतीने रविवारी सकाळी पेडगाव येथे विकसित भारत संकल्प यात्रेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यासाठी केंद्राचे उपसचिव गिरी हे उपस्थित राहणार होते. त्यामुळे जिल्हा प्रशासन कामाला लागले. कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे पंचायत विभागाचे डॉ. संदीप घोन्सीकर, गटविकास अधिकारी दीपा बापट यांच्यासह अधिकारी व कर्मचारी हजर झाले. कार्यक्रमास गावातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. खुर्च्यांसह इतर व्यवस्थाही करण्यात आली काही. हा कार्यक्रम सुरू होणार तेवढ्यात दोन ग्रामस्थांमध्ये सेल्फी पॉईंटवरुन वाद झाला. त्यानंतर या वादाचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले. त्यामुळे गोंधळ वाढला. प्रशासनालाही सूचनेना आपण काय करावे, त्यानंतर हा कार्यक्रम रद्द करून आल्या पावली प्रशासन माघारी फिरल्याने अखेर हा गोंधळ थांबला.

शनिवारी उमरी तर रविवारी पेडगावात गोंधळविकसित भारत संकल्प यात्रा अभियान हा कार्यक्रम गरजू लोकांना लाभ पोहोचण्यासाठी आहे की एका पक्षाचा प्रचार प्रसारासाठी आहे, अशी शंका उपस्थित करत परभणी तालुक्यातील जोडपरळी, पोखर्णी येथे वाद झाला होता. त्यानंतर कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात आला. परंतु शनिवारी उमरी येथे हा कार्यक्रम रद्द करावा लागला. त्यानंतर रविवारी सकाळी पेडगाव येथील कार्यक्रमही गोंधळामुळे प्रशासनाला रद्द करून माघारी फिरावे लागले. त्यामुळे प्रशासन ग्रामस्थांच्या मनामध्ये असलेली शंका का? दूर करत नसेल असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. या गोंधळाबाबत पंचायत समिती प्रशासनाकडून पोलीस ठाण्यात तक्रार देण्याबाबत रविवारी रात्री उशिरापर्यंत हालचाली सुरू होत्या.

केंद्रीय उपसचिव गिरी राहणार होते उपस्थितप्रशासनाने ही या कार्यक्रमासाठी तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, गटविकास आधिकारी,सीडिपीओ यांना कार्यक्रमातील प्रत्येक घटकाची जबाबदारी निश्चित करून दिली. त्यानंतर सकाळी ८:३० वाजता पेडगाव येथे उपस्थित राहण्याचे आदेशही दिले. त्या अनुषंगाने गावांमध्येही कार्यक्रमाचे स्टेज उभारून जोरदार तयारी करण्यात आली. प्रत्येक योजनेची आकडेवारी स्व:ता जवळ ठेवण्याची सुचनाही करण्यात आली होती. या कार्यक्रमाला केंद्रीय उपसचिव गिरी यांची उपस्थिती राहणार होती.

टॅग्स :parabhaniपरभणी