शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनपूर्व पावसाने परभणीतील चार गावांना झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 19:36 IST

मेघगर्जनेसह तीन तास झालेल्या पावसामुळे गाव व परिसरातील नदी, नाले, ओढे तुडुंब भरून वाहू लागले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची ही अचानक पाऊस सुरू झाल्याने चांगलीच धावपळ उडाली

परभणी: तालुक्यातील कुंभारी बाजार, कारला, आर्वी व डिग्रस या चार गावांना सोमवारी झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने चांगलेच झोडपले. तीन तास झालेल्या पावसाने गाव परिसरातील नदी, नाले, ओढे तुडुंब भरून वाहू लागले. मशागतीची कामे करत असलेल्या शेतकऱ्यांची मात्र चांगलीच धावपळ उडाल्याचे दिसून आले.

मागील महिनाभरापासून खरीप हंगामाची तयारी करत असलेल्या शेतकऱ्यांना मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे. त्यातच सोमवारी  परभणी तालुक्यातील कुंभारी बाजार, कारला, आर्वी व डिग्रस या चार गावांमध्ये मान्सून पूर्व पावसाला दुपारी 12 वाजेच्या सुमारास सुरुवात झाली. मेघगर्जनेसह तीन तास झालेल्या पावसामुळे गाव व परिसरातील नदी, नाले, ओढे तुडुंब भरून वाहू लागले. तसेच मशागतीची कामे करत असलेल्या शेतकऱ्यांची ही अचानक पाऊस सुरू झाल्याने चांगलीच धावपळ उडाल्याचे सोमवारी दिसून आले. तसेच अनेक शेतामध्ये पाणी साचले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे पावसाचा जोर चांगला असल्याने कुंभारी व परिसरात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान दिसून आले.  निम्न दुधना प्रकल्पाच्या कुंभारी परिसरातील उजव्या कालव्यातून सहा तास पाणी वाहू लागल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Rainपाऊसparabhaniपरभणी