शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यातील शासकीय विद्युत कामे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 00:53 IST

राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने काढलेल्या परिपत्रकाचा विरोध करण्यासाठी जिल्ह्यातील इलेक्ट्रीकल कॉन्ट्रक्टर संघटनेने शासकीय विद्युत कामे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अधिवेशनामध्ये शिखर संघटनेने आंदोलनही सुरु केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने काढलेल्या परिपत्रकाचा विरोध करण्यासाठी जिल्ह्यातील इलेक्ट्रीकल कॉन्ट्रक्टर संघटनेने शासकीय विद्युत कामे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अधिवेशनामध्ये शिखर संघटनेने आंदोलनही सुरु केले आहे.स्थापत्य विभाग आणि विद्युत विभागाच्या निविदा एकत्रित काढण्याचे परिपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाने काढले असून या परिपत्रकामुळे हजारो विद्युत कंत्राटदार आणि कामगारांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे हे परिपत्रक रद्द करावे, अशी मागणी परभणी इलेक्ट्रीक कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने केली आहे. हे परिपत्रक रद्द होईपर्यंत जिल्ह्यातील शासकीय विद्युत कामे बंद करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. फेडरेशन आॅफ इलेक्ट्रीकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन आॅफ महाराष्ट्र ही ३६ जिल्हा विद्युत कंत्राटदार संघटनेची शिखर संघटना आहे. या संघटनेने देखील परिपत्रक रद्द करण्याच्या मागणीसाठी नागपूर येथील अधिवेशन काळात १६ डिसेंबरपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. याच अंतर्गत १९ डिसेंबर रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे २० हजार विद्युत कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंते आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या सुमारे ३ लाख कुशल- अकुशल कामगारांवर बेरोजगारीची वेळ येणार आहे. त्यामुळे या परिपत्रकाला विरोध केला जात आहे. शासनाची दिशाभूल करुन हा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे निकृष्ट दर्जाची कामे होऊन अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तेव्हा हे परिपत्रक रद्द करावे, अशी मागणी परभणी इलेक्ट्रीक कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे संस्थापक संचालक आर.डी.मगर, मोहम्मद अयुब, सोमनाथ सोन्नेकर, मिलिंद देशपांडे, मुकुल मिश्रा, योगेश मुळी, सागर शिंदे आदींनी केली आहे.परभणी जिल्ह्यात १०० हून अधिक कंत्राटदार४विद्युत विभागाची कामे करणारे जिल्हाभरात १०० हून अधिक कंत्राटदार असून या परिपत्रकामुळे अनेक कामगारांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्णयाचा विरोध करीत कंत्राटदारांनी शासकीय विद्युत कामे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वीज वितरण आणि वीज निर्मिती अंतर्गत होणाºया प्रकल्पाची कामे रखडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीmahavitaranमहावितरण