शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची संभाव्य दुसरी लाट; आरोग्य प्रशासनाने औषधी, ऑक्सीजन सिलिंडरचा साठा वाढविला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 16:40 IST

आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आवश्यक ती तयारी जिल्ह्यात करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे  रुग्ण संख्या कमी झाली असली तरी तालुकास्तरावरील सर्व कोविड केअर सेंटर सुरु आहेतआरटीपीसीआर तपासण्यांची संख्या जिल्ह्यात वाढविण्यात आली आहे.

परभणी : दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आरोग्य विभागाने  वर्तविली असून त्यानुसार जिल्ह्यात प्रशासनाने तयारी केली आहे. ऑक्सिजन सिलिंडरसह औषधींचा साठाही वाढविला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी इतर देशांमध्ये या आजाराची दुसरी लाट आल्याने राज्यातील आरोग्य विभागानेही कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी संपूर्ण तयारी ठेवली आहे.

आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आवश्यक ती तयारी जिल्ह्यात करण्यात आली आहे.  रुग्ण संख्या कमी झाली असली तरी तालुकास्तरावरील सर्व कोविड केअर सेंटर सुरु ठेवले आहेत. त्याचप्रमाणे ऑक्सिजन सिलिंडरची उपलब्धताही वाढविण्यात आली आहे.  दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन आरटीपीसीआर तपासण्यांची संख्या जिल्ह्यात वाढविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे संशयित रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करुन कोरोनाच्या अनुषंगाने उपाययोजना केली जात आहे. ताप सदृश्य आजाराची लक्षणे आढळल्यास तातडीने उपचार करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत.  ग्रामीण भागातील फिव्हर क्लिनिक सुरु करण्यात आले असून शहरात व ग्रामीण भागात पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्यचे नियोजनही करण्यात आले आहे.  कोरोना रुग्णालयांमध्ये आवश्यक असणाऱ्या औषधींचा साठाही सज्ज ठेवण्यात आला असून रुग्णांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे.

प्रयोगशाळेची क्षमता वाढविणारजिल्ह्यात आरटीपीसीआरच्या तपासण्या वाढविल्या आहेत.  येथील प्रयोगशाळेमध्ये दररोज दीडशे स्वॅब तपासण्याची क्षमता आहे. ती आणखी वाढविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यातील सर्व सीसीसी सेंटर सुरु ठेवले असून डॉक्टरांचीही उपलब्धता करण्यात आली आहे. कोरोनाचा धोका अजूनही टळला नसल्याने जिल्ह्यात कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रशासनाकडून केल्या जात आहेत. मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्स पाळणे या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे नागरिकांनी पालन करणे आवश्यक आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी सांगितले. 

ऑक्सिजन बेड ठेवले सज्जजिल्ह्यातील ऑक्सिजन बेड वाढिवले असून पुरेसा औषधीसाठा सज्ज ठेवला आहे. त्याचप्रमाणे रुग्णांवर उपचार करण्यासाठी लागणाऱ्या वैद्यकीय साहित्याचीही पुरेशा प्रमाणात खरेदी केली आहे.

जिल्ह्यात ऑक्सिजन सुविधा असलेल्या बेडची संख्या वाढवून हे बेड सज्ज ठेवले आहेत. तसेच जिल्हा परिषदेच्या इमारतीतही ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध केली आहे. आरोग्य विभागातील डॉक्टरांच्या रिक्त जागा भरल्या आहेत. कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. - दीपक मुगळीकर, जिल्हाधिकारी 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याparabhaniपरभणीmedicineऔषधं