शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ निवारणासाठी हवी सकारात्मक दृष्टी

By admin | Updated: March 4, 2015 15:36 IST

परभणीसह मराठवाड्यातील दुष्काळ निवारणासाठी राजकर्त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन अन् त्यासाठी लागणारा आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्याची मानसिकता हवी.

अभिमन्यू कांबळे ल्ल /परभणीपरभणीसह मराठवाड्यातील दुष्काळ निवारणासाठी राजकर्त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन अन् त्यासाठी लागणारा आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्याची मानसिकता असेल तरच मराठवाड्यावरील मागासलेपणाचा ठपका पुसून काढता येईल अन्यथा केवळ परिषदा घेऊन अन् तोंडाची वाफ घालून काहीही फायदा होणार नाही, याची सातत्याने राजकर्त्यांनी जाण ठेवणे गरजेचे आहे. दुष्काळ मराठवाड्याच्या पाचवीलाच पुजलेला आहे. मराठवाड्याने राज्याला चार मुख्यमंत्री दिले. तरीही मराठवाड्याचा दुष्काळ हटलेला नाही. पश्‍चिम महाराष्ट्रातील नेत्यांचे राज्याच्या राजकारणावरील वर्चस्व झुगारुन देण्यात मराठवाड्यातील नेते मंडळी ही कमी पडली. परिणामी मुख्यमंत्री पद असूनही विभागाचा विकास करता आला नाही. त्यामुळे आजही मराठवाडा मागासलेला म्हणूनच ओळखला जातो. किती दिवस हा मागासलेपणाचा ठपका लावून घ्यायचा, यावर विचार करण्याची वेळ आली आहे. मराठवाड्याप्रमाणेच विदर्भाचीही अवस्था तशीच आहे. त्यामुळे मागासलेपणाची हेटाळणी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सहन केलेलीच आहे. त्यामुळे त्यांना मराठवाड्याचे खरे दु:ख माहिती आहे. विजय केळकर समितीने गेल्या वर्षाच्या अखेरीस विकासाच्या दृष्टीकोनातून राज्यशासनाकडे अहवाल सादर केला. या अहवालात अनेक महत्त्वपूर्ण बाबी समाविष्ट करण्यात आल्या आहेत. या अहवालाचा विचार करुन राज्य शासनाने विकासाचे निर्णय घेण्यास सुरुवात केली तरी परिस्थिती बदलण्यास वेळ लागणार नाही. फक्त तालुका हा विकासाचा घटक न धरता विभाग हा घटक विकासासाठी धरणे आवश्यक आहे. केळकर समितीने दिलेल्या अहवालाप्रमाणे मराठवाड्यातील औरंगाबाद व नांदेड या जिल्ह्यातील सिंचन सामान्य आहे. उर्वरित जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यात सिंचनाची मोठय़ा प्रमाणात तूट असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ही तूट दूर करायची कशी, यावरच खल करणे आता गरजेचे आहे. ज्याप्रमाणे विदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठका होतात. त्याचप्रमाणे औरंगाबाद येथे मंत्रिमंडळाच्या बैठका घेण्याचा पायंडा काही वर्षांपूर्वी पडला होता. परंतु, पुन्हा एकदा पश्‍चिम महाराष्ट्रातील नेते मंडळींचे विघ्न आले आणि बैठका होणे बंद झाले. त्यामुळे मराठवाड्यातील प्रश्नांवर चर्चा होणे थांबले. मराठवाड्याच्या विकासासाठी पाहण्याची दृष्टी बदलणे आवश्यक आहे. याकरीता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण बाजुला ठेवून विकासाचे धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. असे झाले तरच दुष्काळ निवारण व जलनियोजन परिषदेचा हेतू सफल ठरेल. अन्यथा केवळ औपचारिकता म्हणूनच ही परिषद झाली, असे समजले जाईल.

 ■ परभणी जिल्ह्याचा विचार केला असता राज्य शासनाला अजूनही हिंगोली जिल्हा मान्यच नाही. त्यामुळे हिंगोलीचा समावेश परभणीतच करण्यात आलेला आहे. त्यानुसार या दोन जिल्ह्यात केवळ १६.५ टक्के सिंचन क्षेत्र दाखविण्यात आले आहे. तब्बल ८३.५ टक्के सिंचनाची तूट अहवालात दाखविण्यात आली आहे.