शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील राजकारण ढवळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:18 IST

पाथरी : येत्या काही दिवसांत तालुक्यात होवू घातलेल्या ४२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागरचनेस अंतिम मान्यता मिळाली आहे. आता मंगळवारी ...

पाथरी : येत्या काही दिवसांत तालुक्यात होवू घातलेल्या ४२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागरचनेस अंतिम मान्यता मिळाली आहे. आता मंगळवारी ग्रामपंचायतीच्या प्रभागनिहाय प्रारुपयाद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्रा. पं. निवडणुकीचे वातावरण ढवळून निघाल्याचे दिसून येत आहे.

पाथरी तालुक्यात ४९ ग्रामपंचायती असून, ७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका थेट सरपंच जनतेतून निवडून देण्याचा शासनाने निर्णय घेतल्यानंतर पहिल्यांदा सप्टेंबर २०१७ मध्ये पार पडल्या. त्यानंतर आता तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींची मुदत ऑगस्ट २०२० या कालावधीत संपुष्टात आली. निवडणुकीसंदर्भात हालचाली सुरू झाल्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका रद्द करण्यात आल्या. आता अनलॉकमध्ये निवडणूक आयोगाने २९ नोव्हेंबर २०२० रोजी ग्रामपंचायतीच्या प्रभागरचना व आरक्षण निश्चितीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यादृष्टीने नववर्षाच्या प्रारंभी प्रशासकीय पातळीवर कार्यक्रम अंमलबजावणी सुरू झाली आहे तर दुसरीकडे राजकीय मंडळींकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. ग्रामपंचायतीची प्रभागरचना व आरक्षणाचा सुधारित कार्यक्रम निवडणूक आयोगाने २० ऑक्टोबर रोजी जाहीर केला. त्यानंतर सदस्य आरक्षण निश्चित करण्यात येऊन सरपंचपदाचे आरक्षणही काढण्यात आले. त्यानंतर प्रभागनिहाय मतदार याद्या अंतिम करण्यात येऊन १ डिसेंबर रोजी प्रकाशित करण्यात आल्या.

सोमवारपर्यंत हरकती, सूचना नोंदविता येणार

पाथरी तालुक्यातील निवडणूकपात्र असलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यासंबंधी सोमवारी हरकती व सूचना दाखल करण्यात येणार आहेत. त्यानंतर अंतिम मतदारयादी १० डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जाहीर करण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादीत लेखणीकांच्या काही चुका असतील, दुसऱ्या प्रभागात चुकून नाव अंतर्भूत झाले असेल तर हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत.