शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसाचे मारले पॉकेट

By admin | Updated: February 3, 2015 17:08 IST

बसमध्ये चढणार्‍या एका पोलिस कर्मचार्‍याचे पॉकेट चोरताना चोरट्यास रंगेहाथ पकडल्याची घटना २फेब्रुवारी रोजी सकाळी घडली.

गंगाखेड : बसमध्ये चढणार्‍या एका पोलिस कर्मचार्‍याचे पॉकेट चोरताना चोरट्यास रंगेहाथ पकडल्याची घटना २फेब्रुवारी रोजी सकाळी घडली. गंगाखेड येथील बसस्थानकात प्रवाशांची गर्दी मोठय़ा प्रमाणावर असते. प्रवासी बसमध्ये चढताना पाकिटमार प्रवाशांचे पॉकेट मारत आहेत. मात्र याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होत नसल्याने पाकिटमारांनी बसस्थानकामध्ये उच्छांद मांडला आहे. पोलिस कर्मचारी बादल हे सोमवारी सकाळी १0 वाजता परभणी- अहमदपूर बस (क्रमांक एम. एच. 0६- एस. ८७८१) या गाडीमध्ये चढताना शेख नाजूक शेख आसीम (वय ६८) या चोरट्याने गर्दीचा फायदा घेत पॉकेट मारले. पोलिस कर्मचार्‍याच्या ही गोष्ट लक्षात येताच त्याने प्रवाशांच्या मदतीेने शेख नाजूक शेख आसीम या खिसेकापूस पकडूून पोलिस चौकीत आणले वत्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे पॉकेट आढळून आले.पो.कॉ. सुग्रीव कांदे यांच्याकडे चोरट्यास स्वाधीन केले. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. /(वार्ताहर)

■ गंगाखेड येथील बसस्थानकामध्ये पाकीटमार सक्रिय झाले आहेत. पोलिस प्रशासन पाकीटमारावर थातूरमातूर कारवाई करून त्यांना सोडून दिले जाते.त्यामुळे पाकीटमारांचे मनोधैर्य वाढले आहे. पोलिसांनी या चोरट्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

दुचाकीच्या धडकेत एक जण जखमीगंगाखेड- शहरातील तहसील कार्यालयाजवळ एका दुचाकीस्वाराने धडक दिल्याने एक जण जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. नारायण मारोती मुंडे (रा. बडवणी, ता.गंगाखेड) हे तहसील कार्यालयाजवळ बसमध्ये चढत असताना दुचाकीच्या (क्रमांक एम.एच.0९-बी.एन.0८९0) चालकाने जोराची धडक दिली. यामध्ये नारायण मुंडे हे गंभीर जखमी झाले. मुंडे यांच्या फिर्यादीवरुन गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस नायक विजय जाधव करीत आहेत.