शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत आत्मदहनाचा प्रयत्न करणाºया चौघांना पोलिसांनी पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 23:07 IST

विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन आणि संचालकांवर कारवाई करावी, या मागणीसाठी आत्मदहनाचा प्रयत्न करणाºया चौघांना २० फेब्रुवारी रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले. या चौघांपैकी दोघांच्या ताब्यातून रॉकेलचा डबाही जप्त करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन आणि संचालकांवर कारवाई करावी, या मागणीसाठी आत्मदहनाचा प्रयत्न करणाºया चौघांना २० फेब्रुवारी रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले. या चौघांपैकी दोघांच्या ताब्यातून रॉकेलचा डबाही जप्त करण्यात आला आहे.पूर्णा तालुक्यातील धानोरा मोत्या येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटी अ व ब च्या दोन चेअरमन आणि संचालकांविरुद्ध अनेक वेळा उपोषण केल्यानंतरही कारवाई होत नाही. चेअरमन, संचालकांविरुद्ध ठोस पुरावे असतानाही कारवाई होत नसल्यावरून रावण बाबाराव मोहिते, कैलास चंपतराव वाघ, मारोती देवराव मोहिते आणि नरहरी सीताराम मोहिते या चौघांनी १२ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाºयांना पत्र देऊन कारवाई न झाल्यास २० फेब्रुवारी रोजी आत्मदहनाचा इशारा दिला होता.या इशाºयानुसार मंगळवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नवा मोंढा पोलीस ठाणे आणि चुडावा पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाºयांनी तगडा बंदोबस्त लावला. सकाळपासूनच पोलीस कर्मचारी या भागात इशारा देणाºया चौघांचाही शोध घेत होते. दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास मारोती देवराव मोहिते आणि नरहरी सीताराम मोहिते हे दोघेही रॉकेलचा डबा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येत असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी लगेच या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळील रॉकेलचा डबाही हिसकावून घेतला. चुडावा पोलीस ठाण्याचे शेख रफीक, एल.बी. पोकलवार, एन.ए.सुजलोड, राहुल चिंचाणे, नवा मोंढा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेश मलपिल्लू, संतोष चाटे, कैलास बायनावाड, पी.व्ही. दीपक यांनी या दोघांनाही ताब्यात घेऊन नवा मोंढा पोलीस ठाण्यात हजर केले. त्यानंतर उर्वरित दोघांचा शोध घेण्यात आला. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात रावण बाबाराव मोहिते आणि कैलास चंपतराव वाघ हे दोघेही पोलिसांना आढळले. मोबाईल ट्रॅकिंगच्या माध्यमातून पोलिसांनी चौघांनाही ताब्यात घेतले आहे.दरम्यान, आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर या आंदोलकांसह इतर ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी पी.शिव शंकर यांची भेट घेतली. या प्रकरणात २२ फेब्रुवारी रोजी जिल्हा उपनिबंधक आणि लेखाधिकाºयांची संयुक्त बैठक घेऊन तोगडा काढला जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी दिल्यानंतर प्रकरण निवळले.