शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील नो-पार्किंगमधील वाहनांवर पोलिसांची कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 18:05 IST

येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नो पार्किंग झोनमध्ये लावलेली दुचाकी वाहनांवर पोलिसांनी आज कारवाई केली.

परभणी : येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नो पार्किंग झोनमध्ये लावलेली दुचाकी वाहनांवर पोलिसांनी आज कारवाई केली. यावेळी नो- पार्किंगमधील वाहने टोईंग व्हॅनच्या साह्याने उचलून नेण्यात आली. शहर वाहतूक शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.  

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सध्या वाहने उभी करण्यासाठी वाहनतळ निश्चित केलेले नाही. त्यामुळे या कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह कामानिमित्त येणारे नागरिक कार्यालयाच्या मुख्य भिंतीलगतच आपली वाहने उभी करतात. या ठिकाणी नो पार्किंगचा एक जुना फलकही लावलेला आहे. मात्र या फलकाकडे कोणीही गांभीर्याने पाहत नव्हते.

आज दुपारी साधारणतः १२.३० च्या सुमारास शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरक्षीक गजेंद्र सरोदे आणि कर्मचारी टोईंग व्हॅनसह येथे दाखल झाले. नो-पार्किंगमध्ये लावलेली वाहने थेट उचलून व्हॅनमध्ये टाकण्यात आली. या सर्व वाहनधारकांना दंड लावण्यात आला. अचानक केलेल्या कारवाईमुळे नो पार्किंग फळक जवळ वाहन उभे केलेल्या कर्मचारी आणि नागरिकांची चांगलीच धावपळ झाली.

सूचना न देताच कारवाईपरभणी जिल्हाधिकारी कार्यालयात वाहनतळाची जागा निश्चित केलेली नाही. किंवा कारवाई करण्यापूर्वी कुठल्याही सूचना दिल्या नाहीत. असे असताना धडक कारवाई केल्याने वाहनधारकांत संताप व्यक्त केला जात होता. आधी वाहनतळाची जागा निश्चित करावी, त्यानंतरच कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. विशेष म्हणजे, आठ दिवसापूर्वी अशाच पद्धतीने कारवाई करण्यात आली होती.

टॅग्स :Parbhani policeपरभणी पोलीसParkingपार्किंगParabhani collector officeजिल्हाधिकारी कार्यालय परभणी