शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

भगर खाल्ल्यानंतर दोन कुटुंबातील २१ जणांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 14:33 IST

पाथरी शहरातील नामदेव नगर आणि  कानसुर येथील घटना 

पाथरी ( परभणी ) : उपवासासाठी आणलेली भगर व शाबूदाणा यांचे मिश्रण असलेल्या पिठाची भाकर खाल्ल्यानंतर नामदेव नगर येथील एकाच कुटुंबातील 17 व्यक्तींना विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी ( दि. 20 )घडली. तर तालुक्यातील कानसुर येथेही एकाचा कुटुंबातील 4 जणांना देखील भगर खाल्ल्यानंतर विषबाधा झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, सर्व रुग्णांवर पाथरी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत .

पाथरी शहरातील नामदेव नगर येथील एकाच कुटुंबातील व्यक्ती व नातेवाईक यांनी बाजारातून साबुदाणा व भगर यांचे तयार पिठ आणून त्याच्या भाकरी एकादशीनिमित्त खाल्ल्या होत्या. यानंतर या कुटुंबातील काही सदस्य मजुरी कामानिमित्त मानवत तालुक्यातील सावळी सावरगाव येथे एका शेतात गेले. येथे त्यांना चक्कर, उलटी व संडासचा त्रास सुरु झाला. तसेच इकडे घरी थांबलेल्या व्यक्तींनाही चक्कर उलटी अशा तक्रारी सुरू झाल्या. सायंकाळी उशिरा हे सर्व रुग्ण खाजगी दवाखाना व त्यानंतर  ग्रामीण रुग्णालयांमध्ये दाखल झाले आहेत. सर्व रुग्णांवर उपचार चालू असून उपचारानंतर सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुमंत वाघ यांनी सांगितले. दरम्यान, तालुक्यातील कानसुर येथेही एकाच कुटुंबातील दोन पुरुष व दोन महिला यांना भगर खाल्ल्यानंतर संध्याकाळी उशिरा चक्कर व उलटी होणे असा त्रास झाला.

नामदेव नगर येथील  रुग्ण : मीरा शिवा कसबे, विजयमाला भारत कसबे, कौसाबाई सुदाम कांबळे , संजीवनी केरबा गवारे, मुक्ता सुरेश कांबळे, शितल सचिन कांबळे, चंद्रकला संतोष कांबळे, समाधान केरबा गवारे, रेखा बाबासाहेब गोरे, संगिता पांडुरंग आडावे, पूजा हनुमान खंडागळे, तानाबाई वामन कांबळे, सुनिता हनुमान खंडागळे, दिपाली संतोष कांबळे 

कानसुर येथील रुग्ण : पदमीनबाई उत्तमराव कदम, बालासाहेब भगवान शिंदे, अरुणा बालासाहेब शिंदे व श्रीकांत बालासाहेब शिंदे

टॅग्स :parabhaniपरभणीAshadhi Ekadashiआषाढी एकादशी