शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

पीएमडीचा तपास कासवगतीने

By admin | Updated: July 4, 2014 00:11 IST

पाथरी : पीएमडी कंपनीच्या माध्यमातून पाच पट रक्कमेचे आमिष दाखवून ग्राहकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली़

पाथरी : पीएमडी कंपनीच्या माध्यमातून पाच पट रक्कमेचे आमिष दाखवून ग्राहकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली़ या प्रकरणी गुन्हा दाखल झाला़ कंपनीच्या दोन संचालकांना अटकही झाली आणि त्यानंतर जामीनावर मुक्तताही झाली़ परंतु, ग्राहकांची फसवणूक करणारे मुख्य सूत्रधार अद्यापही फरार असल्याने या तपास कामाला गती मिळाली नाही़ यामुळे फसवणूक झालेल्या हजारो ग्राहकांच्या पैशाचे काय होणार असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे़ पाथरी तालुक्यातील खेडुळा येथील मुंजाभाऊ डुकरे याने दोन वर्षापूर्वी पीएमडी मल्टी सर्व्हिस नावाची कंपनी औरंगाबाद येथे स्थापन करून या कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना कमी कालावधीमध्ये दुप्पट, तिप्पट आणि पाचपट रक्कमेचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली़ सुरुवातीच्या कालावधीमध्ये या कंपनीने ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी काही ग्राहकांना दुप्पट आणि तीनपट रक्कम परत केली तर काही ग्राहकांना पुढील तारखेचे धनादेश दिले़ अल्पावधीतच पीएमडी कंपनीने परभणी जिल्ह्यासोबतच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातही पाय रोवून आॅनलाईन पद्धतीने ग्राहकांकडून कंपनीच्या बँक खात्यामध्ये रक्कमा गोळा केल्या़ दोन वर्षात स्थापन झालेल्या कंपनीने जवळपास १०० कोटी रुपयांची उलाढाल गुंतवणुकीच्या माध्यमातून केली़ पैसे परत मिळत नसल्याने दोन महिन्यांपूर्वी ग्राहकांनी या कंपनीचे प्रवर्तक मुंजाभाऊ डुकरे आणि कंपनीच्या एजंटच्या पाठीमागे पैसे परत करण्याचा ससेमिरा लावला़ खेडुळा गावात फसवणूक झालेल्य ग्राहकांच्या बैठका घेऊन लवकरच पैसे परत देण्याचे खोटे आमिषही दाखविले़ ग्राहकांचा ससेमिरा पाठीमागे लागल्याने कोट्यवधी रुपयांची माया जमा केलेल्या शातीर मुंजाभाऊ डुकरे याने पाथरी येथून आपला बोजवारा हलविण्यास सुरुवात केली़ सुरुवातीला पाथरी येथील कार्यालय बंद करून पाथरीतून पलायन केल़े़ त्यानंतर फसवणूक झालेल्या ग्राहकांची मात्र पुन्हा फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने ग्राहकांनी मुख्य प्रवर्तकासह संचालक आणि एजंटचा शोध घेण्यास सुरुवात केली़ परंतु, कोट्यवधी रुपये जमा करून कंपनीच्या मालकाने महाराष्ट्राबाहेर पलायन केले़ मोठी रक्कम हाती लागल्यानंतर कंपनीच्या काही हितचिंतकांनी पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिल्यानंतर प्रकरण थांबेल असा सल्ला दिल्यानंतर या प्रकरणातूनच पोलिस कारवाई झाल्याची चर्चा आहे़ दोन जण यामध्ये अटक झाले असले तरी न्यायालयाने त्यांची जामीनावर मुक्तता केली आहे़ तर मुख्य प्रवर्तकासह इतर आठ जण फरार झाल्यामुळे तपासाची गतीही मंदावली आहे़ (वार्ताहर)बँक खात्यावर नजर का नाही?मल्टी सर्व्हिस कंपनीच्या माध्यमातून ग्राहकांची लुबाडणूक करण्याचे प्रकार परभणी जिल्ह्यात मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर वाढले़ अशा कंपन्या स्थापन करून ग्राहकांना गंडा घालून पोबारा करण्याचे प्रकारही घडले़ पीएमडी नावाची कंपनी दोन वर्षांपूर्वी पाथरीत स्थापन झाली़ या कंपनीमध्ये पाथरी आणि मानवत येथील राष्ट्रीयकृत बँकांमध्ये खाते खोलले़ दोन वर्षांच्या कालावधीमध्ये करोडे रुपयांची उलाढाल झाली़ अशा खात्यावर इनकमटॅक्सची नजर का गेली नाही असा प्रश्नही उपस्थित केला जाऊ लागला आहे़ तक्रारदारांनी पुढे यावेपाथरी पोलिस ठाण्यामध्ये या प्रकरणी एक तक्रार दाखल झाली़ आरोपींची जामिनावरही मुक्तता झाली़ यामध्ये फसवणूक झालेल्या तक्रारदारांनी पुढे येऊन पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन या प्रकरणाचे तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक साईनाथ आव्हाड यांनी केले आहे़