औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर होवून प्रत्येक गावात ग्रामस्थांना पाणी उपलब्ध व्हावे, या उदात्त हेतुने सार्वजनिक पाणीपुरवठा विहीर योजना अंमलात आणली. या विहिरीसाठी ६ लाख ९८ हजार रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला. त्यानुसार परभणी तालुक्यातील ग्रामपंचायतींनी पंचायत समिती प्रशासनाकडे विहीर खोदण्या संदर्भात प्रस्ताव दाखल केले. विशेष म्हणजे बहुतांश ठिकाणी या विहिरीची कामे सुरू झाली आहेत. मात्र परभणी तालुक्यातील वडगाव ईक्कर, कारेगाव, काष्टगाव, खानापूर, पेडगाव, साळापुरी, ताडपांगरी, ठोळा, मिर्झापूर यसह १२ गावांतील विहिरींचे काम सुरू आहे. मात्र कुशल कामाचे देयके मागील अनेक महिन्यांपासून अडकले आहेत. विशेष म्हणजे बहुतांश विहिरीचे खोदकाम व बांधकाम पूर्ण झाले आहे. असे असतानाही पंचायत समिती प्रशासनाकडून या विहिरीची देयके देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. त्यामुहे २ एप्रिलपर्यंत हे देयके न मिळाल्यास खोदलेल्या विहिरीतच जलसमाधाी घेण्याचा इशारा वडगाव येथील उपसरपंच गणेश ईक्कर यांच्यासह आदींनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे दिला आहे.
बारा गावांच्या सार्वजनिक विहिरीची देयके मिळेनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:17 IST