शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पाथरी तालुक्यात प्राथमिक पदवीधर शिक्षकांच्या ८९ जागा अद्यापही रिक्त

By admin | Updated: August 3, 2014 00:59 IST

पाथरी : प्राथमिक पदवीधरांच्या ८९ जागा गेल्या काही महिन्यांपासून रिक्त आहेत. माध्यमिक मुख्याध्यापकांची २४ पदे भरण्यात आली नाहीत.

पाथरी : प्राथमिक पदवीधरांच्या ८९ जागा गेल्या काही महिन्यांपासून रिक्त आहेत. माध्यमिक मुख्याध्यापकांची २४ पदे भरण्यात आली नाहीत. तर प्राथमिक शिक्षकांच्याही १० जागा समुपदेशानंतर रिक्त राहणार आहेत. यामुळे या तालुक्यात शिक्षकांच्या रिक्त जागांचा गहन प्रश्न उपस्थित झाला आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत केंद्र शासन, राज्य शासन शिक्षणासाठी विविध योजनेवर करोडो रुपयांचा खर्च करीत आहेत. मागील काही वर्षात प्राथमिक शिक्षकांच्या अनेक जागा भरण्यात आल्या. परंतु रिक्त पदांची संख्या मात्र कायमस्वरुपी कमी झालेली नाही. प्राथमिक शिक्षकांबरोबरच माध्यमिक शिक्षकांच्या रिक्त जागेचा प्रश्नही तालुक्यामध्ये गेल्या काही महिन्यापासून भेडसावत आहे. प्राथमिक शिक्षकांच्या तालुक्यामध्ये ३४ जागा रिक्त आहेत. समुपदेशन पद्धतीने शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया पंचायत समितीस्तरावर सुरू असली तरी ३४ पैकी केवळ २४ जागाच भरल्या जाणार आहेत. तालुक्यातील शेवटच्या टोकावर रिक्त असलेल्या जागेवर शिक्षक जाण्यास तयार नाहीत. शहराच्या ठिकाणी सर्वच शिक्षकांना बदली हवी आहे. यामुळे शेवटच्या टोकाला असणाऱ्या गावातील शिक्षकांच्या जागा मात्र रिक्तच राहणार आहेत.मा. शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्त जागेची समस्या गेल्या अनेक महिन्यांपासून शिक्षण विभागाला सतावत आहे. पदवीधर शिक्षकांच्या ८९ जागा रिक्त असताना २० मुख्याध्यापकांची पदेही रिक्त आहेत. मधल्या काळामध्ये जिल्हा परिषद शिक्षण विभागाने पदवीधर शिक्षकांना पदोन्नती दिली. यानंतर मात्र या जागा शेवटपर्यंत भरल्या गेल्या नाहीत. शैक्षणिक वर्ष संपण्याच्यापुर्वी तरी या जागा भराव्यात, अशी अपेक्षा पालक वर्गातून केली जात आहे. (वार्ताहर)जागा तातडीने भरल्या जाणार-आठवलेप्राथमिक शिक्षकांच्या बदल्या समुपदेशन पद्धतीने करण्यात येत आहेत. त्याच बरोबर जिल्हास्तरावरून पदवीधर शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी प्रक्रिया सुरू असून पाथरी तालुक्यात रिक्त असलेल्या सर्वच जागा भरण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी आठवले यांनी दिली. पाथरी येथे एका कार्यक्रमास आले असताना या प्रतिनिधीने रिक्त जागेबाबत त्यांच्याशी विचारणा केली. आवश्यक ठिकाणी जागा भरणार - अर्चना पाटील तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या समुपदेशन पद्धतीने ५ आॅगस्ट रोजी केल्या जाणार आहेत. प्रशासन आणि शिक्षकांमध्ये समन्वय न झाल्याने २ आॅगस्ट रोजी ठेवण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली. तालुक्यातील शेवटच्या गावच्या ठिकाणी व आवश्यक त्या ठिकाणी शिक्षकांच्या बदल्या केल्या जातील, अशी माहिती पं.स.च्या सभापती अर्चना शंतनू पाटील यांनी दिली.