शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

अचानक वाहने उचलण्याच्या प्रकाराने परभणीकर त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 00:31 IST

शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांनी उभ्या केलेल्या दुचाकी वाहतूक पोलिसांच्या उपरोक्ष खाजगी व्यक्तींकडून बुधवारी उचलण्याचा प्रकार घडल्याने वाहनधारक त्रस्त झाले असून, रेल्वे पोलिसांच्या हद्दीत केलेली ही उठाठेव शहरवासियांच्या चर्चेचा विषय झाली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांनी उभ्या केलेल्या दुचाकी वाहतूक पोलिसांच्या उपरोक्ष खाजगी व्यक्तींकडून बुधवारी उचलण्याचा प्रकार घडल्याने वाहनधारक त्रस्त झाले असून, रेल्वे पोलिसांच्या हद्दीत केलेली ही उठाठेव शहरवासियांच्या चर्चेचा विषय झाली आहे़परभणी शहरात गेल्या काही महिन्यांपासून वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीला शिस्त लावण्याऐवजी दंड वसूल करून महसूल जमा करण्यावर भर दिला जात आहे़ प्रमुख ठिकाणी वाहनांची तपासणी करून कागदपत्रे नसलेल्या वाहनधारकांना दंड लावला जात असला तरी राजकीय पक्षांच्या काही वाहनधारकांना मात्र मोकळे सोडले जात आहे़ सायलसरमध्ये छेडछाड करून जोराने आवाज काढणाऱ्या बुलेट चालकांना अभय देवून ग्रामीण भागातून आलेल्या वाहनधारकांनाच टार्गेट केले जात असल्याचा प्रकारही पहावयास मिळत आहे़ याशिवाय शहरातील नो पार्किंग झोनमध्ये वाहने उभी केल्याने ती उचलून नेवून त्यांच्याकडून दंड आकारण्याचा प्रकारही गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे़ यासाठी काही खाजगी व्यक्तींना नियुक्त करण्यात आले आहे़ या खाजगी व्यक्तींनी पोलिसांच्या नियुक्तीचा गैरफायदा घेणेही आता सुरू केले आहे़ बुधवारी सकाळी ११़३० च्या सुमारास रेल्वे आरक्षणाचे तिकीट काढण्यासाठी आलेल्या किंवा नातेवाईकांना घेण्यासाठी, सोडण्यासाठी आलेल्या वाहनधारकांनी रेल्वे स्टेशन समोरील एका बाजुला वाहने उभी केली होती़ याचवेळी वाहतूक पोलीस सोबत नसतानाही ही वाहने उचलून नेणारे कर्मचारी वाहनासह दाखल झाले व त्यांनी तातडीने उभी असलेली सर्व दुचाकी वाहने मोठ्या वाहनात टाकण्यास सुरुवात केली़ काही क्षणातच तेथील ८ ते १० दुचाकी या वाहनात टाकून हे कर्मचारी निघून गेले़ रेल्वेस्थानकातून बाहेर आलेल्या प्रवासी व नागरिकांना आपले वाहन उभे केलेल्या जागी नसल्याचे दिसून आल्याने त्यांची तारांबळ उडाली़ वाहनाबाबत शोधाशोध केली असता त्यांना वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी वाहन नेल्याचे सांगण्यात आले़ प्रत्यक्षात वाहतूक शाखेचा एकही कर्मचारी या दुचाकी घेवून जाणाºया खाजगी व्यक्तींसोबत नव्हता़ विशेष म्हणजे रेल्वे पोलिसांच्या कार्यक्षेत्रात झालेली ही उठाठेव वाहनधारकांच्या चर्चेचा विषय झाली होती़ या प्रकाराबद्दल अनेक वाहनधारकांनी संतापही व्यक्त केला़चारचाकी वाहनांना सोडून दिले४बुधवारी रेल्वेस्थानकासमोर दुचाकी वाहनांबरोबरच चारचाकीही वाहने उभी होती; परंतु, वाहतूक पोलिसांच्या नावाखाली आलेल्या या कर्मचाºयांनी चार चाकी वाहनांना हातही लावला नाही़ फक्त दुचाकी वाहनेच उचलण्याचे उद्द्ष्टि डोळ्यासमोर ठेवले़ त्यामुळे दुचाकी चालकांना एक आणि चार चाकी वाहन चालकांना एक अशी दुजाभाव करणारी वागणूक का दिली जात आहे? असाही सवाल यावेळी दुचाकी चालकांनी उपस्थित केला़

टॅग्स :parabhaniपरभणीTrafficवाहतूक कोंडीParkingपार्किंग