शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
3
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
4
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
5
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
7
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
8
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
9
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
10
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
11
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
12
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
13
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
14
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
15
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
16
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
17
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
18
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
19
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
20
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे

परभणीकर गारठले, पारा आठ अंशावर; शहर परिसरात हुडहुडी कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 12:46 IST

मराठवाडा विभागात पुढील ३ ते ४ दिवसात कमाल व किमान तापमानात हळूहळू एक ते दोन अंशाने वाढ होण्याची शक्यता

परभणी : शहर परिसरात नागरिकांना शुक्रवारची सकाळ थंडीने हुडहुडणारी ठरली. फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच किमान तापमान दहा अंशाखाली आले होते. शुक्रवारी किमान तापमान ८.२ अंश सेल्सिअस नोंद झाल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राने दिली. या तापमानाने परभणीकर गारठल्याचे दिसून आले.

शहरात डिसेंबर महिन्यात, जानेवारी महिन्यात दोन ते तीन वेळेला किमान तापमान १० अंशाखाली आले होते. सर्वाधिक कमी तापमान ५.६ अंश सेल्सिअस नोंद झाले होते. त्यानंतर हळूहळू तापमानात दररोज सातत्याने वाढ झाली. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला बुधवारी किमान तापमान १५.६, गुरुवारी १२.४ अंश सेल्सिअस नोंद झाले होते. गुरुवार पेक्षा शुक्रवारी किमान तापमानामध्ये चार अंशाची घट झाल्याचे दिसून आले. शुक्रवारी सकाळी थंडी वाढल्याने शहरात जनजीवनावर सुद्धा परिणाम झाला होता. दुपारपर्यंत वातावरणात गारवा कायम होता.

किमान तापमानात वाढ होण्याची शक्यताप्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईच्या अंदाजानुसार मराठवाडा विभागात पुढील ३ ते ४ दिवसात कमाल व किमान तापमानात हळूहळू एक ते दोन अंशाने वाढ होण्याची शक्यता आहे. ३ ते ९ फेब्रुवारी दरम्यान कमाल व किमान तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा किंचित कमी राहण्याची शक्यता आहे तर १० ते १६ फेब्रुवारी दरम्यान कमाल व किमान तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा किंचित कमी राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :parabhaniपरभणी