शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत मटका जोरात सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 01:13 IST

नोटबंदी, जीएसटीमुळे एकीकडे बाजारपेठेत मंदी असली तरी दुसरीकडे मटका, जुगार मात्र तेजीत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले. मंगळवारी आणि बुधवारी शहरात फेरफटका मारला तेव्हा दोन्ही दिवस अर्ध्या भागातील मटक्याच्या बुक्या बंद असल्याचे तर अर्ध्या भागात खुलेआम सुरू असल्याचे दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : नोटबंदी, जीएसटीमुळे एकीकडे बाजारपेठेत मंदी असली तरी दुसरीकडे मटका, जुगार मात्र तेजीत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले. मंगळवारी आणि बुधवारी शहरात फेरफटका मारला तेव्हा दोन्ही दिवस अर्ध्या भागातील मटक्याच्या बुक्या बंद असल्याचे तर अर्ध्या भागात खुलेआम सुरू असल्याचे दिसून आले.परभणी जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून अवैध धंद्यांनी कळस गाठला आहे. मटका, जुगार हे अवैध धंदे बंद करावेत, अशी मागणी सामाजिक संघटनांकडून होत राहते, मात्र हे अवैध धंदे पूर्णत: बंद होत नाहीत. या पर्श्वभूमीवर मंगळवार व बुधवार असे दोन दिवस ‘लोकमत’ने शहरात स्टिंग आॅपरेशन केले, तेव्हा मटका खुलेआम सुरू असल्याचे उघड झाले. बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास या स्टिंग आॅपरेशनला सुरूवात केली. येथील स्टेडियम मार्केट परिसरात काही पान टपºयांमधून मटक्याच्या चिठ्ठ्या दिल्या जात असल्याचे पहावयास मिळाले. दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास नवा मोंढा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुलशनाबाग परिसरात फेरफटका मारला तेव्हा या ठिकाणी तीन ते चार टपºयांमध्ये मटका खेळविला जात होता. गुलशनाबाग भागात १, अशोकनगर भागात एका ठिकाणी तर गौतमनगर येथे एका ठिकाणी मटका खेळला जात असल्याचे दिसून आले.दुपारी २ वाजण्याच्या सुमारास जायकवाडी परिसरातही मटका सुरू होता. याच भागात एका हॉटेलमध्ये मटका घेतला जात असल्याचेही दिसून आले. वांगी रोड भागातही रस्त्याच्या एका बाजूला मटका बुक्या सुरू होत्या तर दुसºया बाजूच्या बुक्या बंद असल्याचे दिसून आले. वांगीरोडवर कॅनॉलपर्यंत फेरफटका मारला तेव्हा काही मटक्याच्या टपºया बंद तर काही टपºयांमध्ये सर्रास मटका खेळविला जात होता.शहरातील धाररोड, जुना मोंढा, नांदखेडा रोड या भागातही मटका सर्रास घेतला जात असल्याचे पहावयास मिळाले. त्याचप्रमाणे डनलॉपरोड परिसरातही मटका सुरू असल्याचे दिसून आले़मटक्याच्या या व्यवहरातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. मटका व इतर अवैध धंदे बंद करण्याची मागणी वारंवार होत असताना छोट्या-मोठ्या कारवाया करुन अवैध धंद्यांविरुद्ध कारवाया सुरू असल्याचे पोलिसांकडून दाखविले जाते. मात्र मटका बंद करण्यासाठी गांभिर्याने प्रयत्न होत नसल्याचे दिसत आहे.सायंकाळी सुरू झाला मटकाशहरातील अनेक भागात मंगळवारी दुपारपर्यंत मटक्याची दुकाने बंद होती. ‘लोकमत’ चमूने पाहणी केली तेव्हाही अनेक भागातील मटक्याची दुकाने बंद दिसून आली. मात्र, सायंकाळी ४ वाजेनंतर शहरातील मटका बुक्या पुन्हा सुरू केल्याची माहिती मिळाली. मटका चालविणाºया मुख्य एजंटांमध्ये समझोता झाल्याने शहरातील सर्व मटका बुक्या सुरू झाल्या असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे मंगळवारनंतर बुधवारी केलेल्या पाहणीतही मटका बुक्या सुरू असल्याचे दिसून आले.पोलीस ठाण्यासमोरुचमिळाल्या चिठ्ठ्यापरभणी शहरातील मटका बुकींचे स्टिंग आॅपरेशन करीत असताना प्रत्यक्ष मटक्याच्या चिठ्ठ्या मिळविण्याचा प्रयत्न केला. नवा मोंढा पोलीस ठाण्याच्या समोरच सुरू असलेल्या बुकीवर मटका लावला, त्या ठिकाणी मटक्याच्या चिठ्ठ्याही हस्तगत केल्या.वांगीरोड भागातही एका मटका बुकीवरुन प्रत्यक्ष चिठ्ठ्या मिळाल्याने शहरात मटका जुगार सुरू असल्याचेच दिसून आले. वांगीरोड भागात दोन ठिकाणी मटका खेळविला जात असल्याचे या पाहणीत दिसून आले.