शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जि़प़ विषय समित्यांची सोमवारी निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 23:53 IST

जिल्हा परिषदेच्या ४ विषय समित्यांच्या सभापतींची २० जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता निवडणूक होणार असून, यासाठी निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांची पीठासन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा परिषदेच्या ४ विषय समित्यांच्या सभापतींची २० जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता निवडणूक होणार असून, यासाठी निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांची पीठासन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे़जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची ७ जानेवारी रोजी निवड झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत विषय समित्यांच्या सभापतींची निवड करणे क्रमप्राप्त आहे़ त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांच्या मान्यतेने १० जानेवारी रोजी सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ़ संजय कुंडेटकर यांनी या संदर्भातील आदेश काढला आहे़ त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण, समाजकल्याण समितीसह अन्य दोन समित्यांच्या सभापतींसाठी २० जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता निवडणूक घोषित करण्यात आली असून, पीठासन अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ त्यामुळे आता आठ दिवसांत जिल्हा परिषदेच्या सर्व पदाधिकारी निवडीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे़ या आठ दिवसांत सभापतीपद मिळविण्यासाठी जि़प़ सदस्यांमध्येही फिल्डींग लावण्याची तयारी सुरू झाली आहे़सभापतीपदासाठी राष्ट्रवादीत चुरस कायम४जिल्हा परिषदेत महाविकास आघाडी सत्तेत आली आहे़ अध्यक्ष व उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे असून, दोन सभापतीपदेही राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहणार आहेत़ याशिवाय शिवसेनेकडे एक व काँग्रेसकडे एक विषय समितीचे सभापती पद जाऊ शकते़ ‘लोकमत’ला मिळालेल्या माहिती नुसार जि़प़चे शिक्षण व आरोग्य आणि समाजकल्याण ही दोन सभापतीपदे राष्ट्रवादी काँग्रेसकडे असू शकतात तर शिवसेना व काँग्रेसकडे महिला व बालकल्याण आणि कृषी सभापतीपद असू शकते़४शिवसेना समाजकल्याण सभापतीपदासाठी आग्रही आहे़; परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस हे पद सेनेला देण्याची सुतराम शक्यता नाही़ त्यामुळे या पदासाठी राष्ट्रवादी-सेनेत चुरस निर्माण झाली आहे़ याशिवाय राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या दोन सभापतीपदांसाठीही पक्षांतर्गत मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे़ माजी आ़ विजय भांबळे यांच्या मर्जीतील सदस्यांनाच सभापतीपद मिळण्याची दाट शक्यता आहे़ दुसरीकडे काँग्रेस व शिवसेनेत स्पर्धक कमी आहेत़ पडद्यामागे यासाठी नावेही निश्चित झाले असल्याचे समजते; परंतु, ती जाहीर करून अन्य सदस्यांची नाराजी नको, म्हणून ऐनवेळी ती जाहीर केली जावू शकतात़

टॅग्स :parabhaniपरभणीZP Electionजिल्हा परिषद