शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: यंदाच्या लग्नसराईला आचारसंहितेची आडकाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 23:55 IST

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ऐन लग्नसराईतच लागू झाल्याने सर्वसामान्यांना अडचणींना सामोरे जावे लागत असून खरेदीसाठी रोख रक्कम सोबत बाळगणे जिकिरीचे वाटत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ऐन लग्नसराईतच लागू झाल्याने सर्वसामान्यांना अडचणींना सामोरे जावे लागत असून खरेदीसाठी रोख रक्कम सोबत बाळगणे जिकिरीचे वाटत आहे.लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता १० मार्चपासून लागू झाली आहे. १८ एप्रिल रोजी मतदानानंतर आचारसंहिता शिथील होणार असली तरी ती २३ मेपर्यंत लागू राहणार आहे. या कालावधीतच विवाहाचे मुहूर्त आहेत. त्यामध्ये १७ ते २० एप्रिल, २२ ते २४ एप्रिल, २६ ते २८ एप्रिल, ७, ८ , १२, १४, १५, १७, १९, २१ आणि २३ मे या विवाहाच्या तारखा आहेत. या तारखांना ज्यांच्या घरी लग्न कार्य आहे, त्यांच्या घरी खरेदीसाठी घाई होणार आहे. खरेदीला जाण्यासाठी पैसे सोबतही बाळगावे लागणार आहेत. आता निवडणुकीची आचारसंहिता असल्याने प्रत्येक शहरात प्रवेश करण्याच्या ठिकाणावर तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणावर प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे. सोबत पैसे आढळल्यास त्याचा हिशोब नियुक्त आलेल्या पथकाला द्यावा लागत आहे. शिवाय त्या सोबतच याचे पुरावे द्यावे लागत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या नाकीनऊ येत आहे. परिणामी निवडणुका होऊन जाऊ द्या, त्यानंतर लग्नाचे पाहूत, असाही काहीसा सूर वºहाडी घेऊ लागले आहेत.एप्रिल आणि मे या दोन महिन्यांमध्ये लग्न तिथींची संख्या अधिक असते. या काळात मंगल कार्यालय बहुतांश तारखांना महिनाभरापूर्वीच बुक होतात. मात्र यावर्षी एप्रिल महिन्यात दोन ते तीन तारखांनाच मंगल कार्यालयाची बुकिंग झाली. मे महिन्यात यापेक्षाही गंभीर परिस्थिती आहे. सर्वसाधारणपणे या दोन महिन्यात मंगल कार्यालयाच्या माध्यमातून चांगला व्यवसाय होतो. मात्र यावर्षी व्यवसायावर ९० टक्के परिणाम झाला आहे.-प्रमोद वाकोडकर, व्यावसायिकयावर्षी लग्नतिथींची संख्या अधिक आहे; परंतु, त्या तुलनेत लग्न सोहळ्यांची संख्या मात्र रोडावली आहे. सर्वसाधारणपणे एप्रिल, मे महिन्यात मोठ्या प्रमाणात मंगल कार्यालयांची बुकिंग असते. मात्र यावर्षी ती निम्म्यावर आली आहे. तसेच लग्न सोहळ्यातील हौस आणि खर्चालाही आखडता हात घेतल्याने मंगल कार्यालयाचा व्यवसाय अडचणीत सापडला आहे. यावर्षी निर्माण झालेली दुष्काळी परिस्थती आणि त्याच जोडीला निवडणुकीची आचारसंहिता याचा परिणाम या व्यवसायावर झाला आहे.-शंकर आजेगावकर, व्यासायिक

टॅग्स :parabhaniपरभणीElectionनिवडणूक