शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: महिलाच चालविणार ५ मतदान केंद्रांचा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 00:02 IST

परभणी विधानसभा मतदार संघातील ५ मतदान केंद्रांवर केवळ महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचीच नियुक्ती केली जाणार असून, महिलांच्या माध्यमातून हे केंद्र चालविले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : परभणी विधानसभा मतदार संघातील ५ मतदान केंद्रांवर केवळ महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचीच नियुक्ती केली जाणार असून, महिलांच्या माध्यमातून हे केंद्र चालविले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे़भारतीय लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रियेला महत्त्व असून, ही निवडणूक प्रक्रिया किचकट असते़ सर्वसाधारणपणे पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ही प्रक्रिया राबविली जाते़ शक्यतो महिला कर्मचाऱ्यांना बैठी कामे आतापर्यंत दिली जात होती़ मात्र या मतदान प्रक्रियेमध्ये महिलांचा सहभाग वाढावा, महिलांनीही स्वत:हून या प्रक्रियेत समाविष्ट व्हावे, या उद्देशााने प्रत्येक लोकसभा मतदार संघात महिला मतदान केंद्र स्थापन करण्याचे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत़ निवडणूक विभागाच्या या निर्देशानुसारच परभणी विधानसभा मतदार संघातही पाच महिला मतदान केंद्र निर्माण करण्याची तयारी सुरू झाली आहे़शहरातील वसमत रोडवरील कृषी सारथीनगर भागातील गांधी विद्यालय, एकतानगर भागातील गांधी विद्यालय, सारंग स्वामी शाळा, मुंजाजी विठ्ठलराव शिंदे विद्यालय आणि जुना पेडगाव रोड भागातील भारतीय बाल विद्यामंदिर शाळेतील मतदान केंद्र हे महिला मतदान केंद्र म्हणून चालविण्याचे नियोजन केले जात आहे़ लवकरच या संदर्भात अधिकृत निर्णय होणार आहे़ या महिला मतदान केंद्रांवर मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी क्रमांक १, २, ३, सुरक्षा रक्षक आणि सेवक या सर्व पदांची जबाबदारी महिला अधिकारी, कर्मचाºयांना दिली जाणार आहे़ त्यामुळे या केंद्रांचा कारभार महिलांच्या माध्यमातून होणार असून, याच माध्यमातून केंद्रावरील महिलांचे मतदान वाढेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीElectionनिवडणूकWomenमहिला