शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : स्त्री रुग्णालय इमारतीचे दुसऱ्यांदा होणार भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 00:41 IST

येथील १०० खाटांच्या स्वतंत्र स्त्री रुग्णालयाच्या इमारतीचे साडेचार वर्षानंतर दुसºयांदा रविवारी भूमिपूजन होणार असून यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत या इमारतीच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील १०० खाटांच्या स्वतंत्र स्त्री रुग्णालयाच्या इमारतीचे साडेचार वर्षानंतर दुसºयांदा रविवारी भूमिपूजन होणार असून यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत या इमारतीच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध झाला आहे.परभणी येथे २००५ मध्ये स्त्री रुग्णालयास मंजुरी मिळाली होती. त्यानंतर २००६ मध्ये जिल्हा रुग्णालयात ते कार्यान्वित झाले. त्यावेळी जिल्हा रुग्णालयातील ७० खाटांचा स्त्री रुग्ण विभाग बंद करण्यात आला होता. त्यानंतर शहरातील शनिवार बाजार भागात स्त्री रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले; परंतु, या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्या जागेत नेत्र रुग्णालयाचे स्थलांतर करण्यात आले. त्यानंतर जुलै २०१४ मध्ये तत्कालीन आरोग्य राज्यमंत्री फौजिया खान यांच्या हस्ते शहरातील दर्गारोड भागात स्त्री रुग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यावेळी फक्त कोनशिला उभारण्याचीच औपचारिकता पूर्ण झाली होती. निधीची पुरेशी तरतूद नसल्याने इमारत उभी राहू शकली नाही. त्यानंतरच्या वर्षात २ कोटी रुपयांचा निधी या इमारतीसाठी उपलब्ध झाला. आता राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत २० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद या स्त्री रुग्णालयाच्या इमारतीसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यातील ३ कोटी रुपये सध्या जिल्हा आरोग्य विभागाकडे प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. १३ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दुसºयांदा या स्त्री रुग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन होणार आहे. यावेळी आरोग्य संचालक तथा आयुक्त अनुपकुमार यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, औरंगाबाद येथील उपसंचालक डॉ.स्वप्नील लाळे यांच्यासह स्थानिक अधिकारी, लोकप्रतिनिधी आदींची उपस्थिती राहणार आहे. विशेष म्हणजे यापूर्वी स्त्री रुग्णालयाच्या नावावर शनिवार बाजार भागात इमारत बांधण्यात आल्याने लेखापरिक्षणात या संदर्भात आक्षेप घेतील म्हणून माता आणि बालकांच्या (एमसीएच विंग) आरोग्याची १०० खाटांची इमारत या नावाखाली इमारत उभारण्यात येणार आहे. या इमारतीचे संपूर्ण बांधकाम हे राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या औरंगाबाद येथील कार्यालयांतर्गत होणार आहे. या भूमिपूजन सोहळ्याची आरोग्य विभागाच्या वतीने संपूर्ण तयारी करण्यात आली असून भूमिपूजनानंतर तातडीने बांधकामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाल्याने टळले भूमिपूजनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आॅक्टोबर महिन्यात परभणीच्या दौºयावर येणार होते. यावेळी या स्त्री रुग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन होणार होते, तशी कार्यक्रम पत्रिका आरोग्य विभागाच्या वतीने वाटप करण्यात आली होती; परंतु, मुख्यमंत्री फडणवीस यांचा दौरा रद्द झाला आणि या इमारतीचे भूमिपूजन बारगळले होते. १८ फेब्रुवारी २०१८ रोजी तत्कालीन आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी या स्त्री रुग्णालयाच्या नियोजित जागेची पाहणी केली होती. त्यानंतर सावंत यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालय परिसरातील विविध ५ इमारतीचे लोकार्पण करण्यात आले होते.

टॅग्स :parabhaniपरभणीhospitalहॉस्पिटल