शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

परभणी : येलदरीतून सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 23:41 IST

येलदरी धरणाच्या मृतसाठ्यातून १४ जानेवारी रोजी धरणाच्या ३ पैकी एका सर्व्हिस गेटमधून सिद्धेश्वर धरणात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे येलदरी धरणावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजना व जिंतूर शहराला पाणी पुरेल की नाही, याबाबत शंका उपस्थित होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयेलदरी (परभणी) : येलदरी धरणाच्या मृतसाठ्यातून १४ जानेवारी रोजी धरणाच्या ३ पैकी एका सर्व्हिस गेटमधून सिद्धेश्वर धरणात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे येलदरी धरणावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजना व जिंतूर शहराला पाणी पुरेल की नाही, याबाबत शंका उपस्थित होत आहे.येलदरी धरणात २०१८ च्या पावसाळ्यात केवळ ९ टक्केच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला होता. यातून येथील वीज निर्मिती केंद्राच्या गेटमधून ३१ डिसेंबर २०१८ रोजी पाणी सोडण्यात आले होते. विद्युत केंद्रातील दरवाजामधून उपयुक्त पाणीसाठ्यातून ६० दलघमी पाणी सोडण्यात आले आहे. त्यानंतरही जलसंपदा विभागाने १४ जानेवारी रोजी दुपारी सर्व्हिस गेटमधून पाणी सोडले आहे. या दरवाज्यातून साधारणत: २ दलघमी पाणी सोडण्यात येत आहे. हे पाणी किती दिवस सोडले जाणार आहे, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. येलदरी धरणाची एकूण उपयुक्त पाणी साठवणूक क्षमता ही ८१० दलघमी आहे. तर १२४ दलघमी एवढी मृत पाणीसाठा क्षमता आहे. यापैकी यावर्षी केवळ एकूण क्षमतेच्या ९ टक्के एवढेच उपयुक्त पाणी धरणात नव्याने आले होते. हे पाणी १४ दिवसांमध्ये सोडण्यात आले. आता धरणात केवळ १२४ दलघमी एवढा मृत पाणीसाठा आहे. यातूनही पाणी सोडण्याचे आदेश पाटबंधारे विभागाने दिल्याने मंगळवारपासून येलदरी धरणातील मृत पाणीसाठाही सोडण्यात येत आहे. त्यामुळे परभणी व हिंगोली जिल्ह्यावर पाण्याचे संकट ओढावण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.धरणात १४ टक्के गाळधरणाच्या एकूण क्षमतेच्या १४ टक्के गाळ धरणात असल्याचा अहवाल २००९ साली मेरीटेक या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात नोंदविण्यात आला होता. हे सर्वेक्षण होऊन जवळपास १० वर्षे उलटली आहेत. त्यामुळे गाळात नक्कीच वाढ झाली आहे. या परिस्थितीत प्रशासन कोणत्या आकडेवारीनुसार येलदरी धरणातील पाण्याचे गणित मांडत आहे, हे सांगणे कठीणच आहे. जलसंपदा विभागाच्या या गलथान कारभारामुळे येणाऱ्या काळात पाणीपुरवठा योजनांसह जिंतूर शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीDamधरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प