शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पालम तालुक्यात रोजगार हमीच्या कामांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:39 IST

रोजगार हमी योजनेअंतर्गत छाननी समितीकडे दाखल केलेल्या प्रस्तावांना तीन महिन्यानंतरही मान्यता मिळाली नाही. त्यामुळे तालुक्यातील रोहयोची कामे ठप्प पडली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम : रोजगार हमी योजनेअंतर्गत छाननी समितीकडे दाखल केलेल्या प्रस्तावांना तीन महिन्यानंतरही मान्यता मिळाली नाही. त्यामुळे तालुक्यातील रोहयोची कामे ठप्प पडली आहेत.पालम तालुक्यामध्ये मागील ३ ते ४ महिन्यापासून रोजगार हमी योजनेची कामे ठप्प पडली आहेत. तालुक्यातून सिंचन विहिरीचे ३३६ प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल झाले आहेत. तसेच शौचालय बांधकामाचे २७, विहीर पूनर्भरणचे ७४, अंतर्गत रस्त्याचे १८, शेततळ्याची ११ असे ४६६ प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल करुनही या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली नाही. रोहयो अंतर्गतच्या कामांना मान्यता मिळावी, यासाठी पंचायत समितीचे कर्मचारी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील छाननी समितीकडे प्रत्येक बैठकीच्या वेळेस प्रस्ताव घेऊन जात आहेत; परंतु, समितीचे अनेक सदस्य बैठकीला हजर राहत नसल्याने बैठक होत नाही. त्यामुळे त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. ९ मार्च रोजी पंचायत समितीचे कर्मचारी प्रस्ताव घेऊन छाननी समितीकडे गेले झाले होते. परंतु, समितीचे सदस्य बैठकीला हजर नसल्याने सर्व सदस्यांच्या सह्याचे कारण देत उपविभागीय अधिकारी यांनी हे प्रस्ताव परत पाठविले. जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी दोन दिवसांपूर्वी बैठक घेऊन रोहयोची कामे मार्गी लावावीत, असा आदेशही दिला होता. परंतु, छाननी समितीकडून या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात येत आहे. तीन महिन्यांपासून हा प्रकार सुरु असून कामे खोळंबली आहेत. छाननी समिती प्रस्तावांना मंजुरी का देत नाही, या मागचे गौडबंगाल मात्र अजूनही समोर आलेले नाही.मजुरांचे स्थलांतर४ पालम तालुक्यामध्ये रोजगार हमी योजनेची कामे तीन महिन्यांपासून ठप्प पडली आहेत. तालुक्यातील मजुरांच्या हाताला कामे नसल्याने मजूर कामानिमित्त बाहेरगावी जात आहेत. तालुक्यामध्ये रोहयोची कामे उपलब्ध करुन दिल्यास या मजुरांच्या हाताला कामे उपलब्ध होतील.पंचायत समितीमध्ये दाखल झालेले प्रस्ताव छाननी समितीपुढे दरमहा ठेवण्यात येत आहेत. परंतु, उपविभागीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी कामाच्या मजुंरीसाठी अडवणूक करीत आहेत. याचा त्रास आम्हाला होत असून जनतेला तोंड देताना नाकी नऊ येत आहे. वरिष्ठ अधिकाºयांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.-सावित्री आत्माराम सोडनर, सभापती