शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : जीपीएस यंत्रणा असलेल्या १८ कंटेनरमधून मतदान यंत्रे रात्रीतून पोहचले स्ट्राँग रुममध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:00 IST

परभणी लोकसभा मतदार संघातील ६ विधानसभा मतदारसंघात गुरुवारी मतदान झाल्यानंतर कडक बंदोबस्तात ही मतदान यंत्रे जीपीएस यंत्रणा असलेल्या १८ कंटेनरमधून शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयाच्या स्ट्राँगरुममध्ये रात्री उशिरापर्यंत आणण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : परभणी लोकसभा मतदार संघातील ६ विधानसभा मतदारसंघात गुरुवारी मतदान झाल्यानंतर कडक बंदोबस्तात ही मतदान यंत्रे जीपीएस यंत्रणा असलेल्या १८ कंटेनरमधून शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयाच्या स्ट्राँगरुममध्ये रात्री उशिरापर्यंत आणण्यात आली.लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी रात्री मतदान संपल्यानंतर प्रत्येक विधानसभास्तरावर मतदान यंत्र जमा करण्यात आले. त्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या मुख्यालयातून हे मतदान यंत्र आणण्यासाठी जीपीएस यंत्रणा असलेले प्रत्येकी ३ या प्रमाणे १८ कंटेनर उपलब्ध करुन देण्यात आले होते. त्यानुसार गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सर्व मतदान यंत्र परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालयातील स्ट्राँगरुममध्ये कडक सुरक्षा व्यवस्थेत विधानसभानिहाय ठेवण्यात आले आहेत. यासाठी २५० रॅकची उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी तीनस्तरावर कडक पोलीस बंदोबस्त २३ मेपर्यंत राहणार आहे. यासाठी सीआरपीएफ आणि एसआरपीएफचे जवान २४ तास कार्यरत राहणार आहेत. स्ट्रा़ँगरुमच्या परिसरात ३० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून येथे २४ तास एक नायब तहसीलदार कायमस्वरुपी नियुक्त करण्यात आला आहे. याशिवाय दिवसातून दोनवेळा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची या स्ट्राँगरुमला भेट राहणार आहे. एखाद्या उमेदवाराला स्ट्राँगरुम परिसरात थांबायचे असल्यास स्ट्राँगरुमच्या बाहेरील बाजुस तशी व्यवस्था निवडणूक विभागातर्फे करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान झाल्यानंतर ईव्हीएम मशीनची वाहतूक खुल्या वाहनातून न करता बंदिस्त असलेल्या कंटेनरमधून करावी. तसेच वाहनावर जीपीएस यंत्रणा बसवण्यात यावी, असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार सर्व विधानसभा मिळून जवळपास १८ कंटेनरचा उपयोग करण्यात आला. यासर्व कंटेनरवर जीपीएस यंत्रणा होती. तसेच सीआरपीएफच्या सुरक्षा घेºयात ते परभणीत पोहोचवण्यात आले.

टॅग्स :parabhaniपरभणीparbhani-pcपरभणीElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक