शहरं
Join us  
Trending Stories
1
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
2
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
3
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
4
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
5
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
6
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
7
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
8
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
10
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
11
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
12
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
14
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
15
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
16
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
17
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
18
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
19
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
20
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी

परभणी : विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीसाठी अग्निपरीक्षा ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 00:02 IST

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या जिंतूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे संजय जाधव यांना २३ हजार ९५७ मतांची आघाडी मिळाल्याने आगामी विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीचे आ़ विजय भांबळे यांच्यासाठी अग्नीपरीक्षा ठरणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या जिंतूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे संजय जाधव यांना २३ हजार ९५७ मतांची आघाडी मिळाल्याने आगामी विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीचे आ़ विजय भांबळे यांच्यासाठी अग्नीपरीक्षा ठरणार आहे़लोकसभेच्या बहुतांश निवडणुकींमध्ये जिंतूर विधानसभा मतदारसंघाने शिवसेनेलाच आघाडी दिली आहे़ २०१४ मध्ये पहिल्यांदाच या मतदारसंघातून आ़ विजय भांबळे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळविला़ त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत या मतदारसंघातून १५ पैकी १३ जिल्हा परिषदेचे सदस्य राष्ट्रवादीचे निवडून आले़ तसेच जिंतूर व सेलू या दोन्ही पंचायत समित्या आणि जिंतूर नगरपालिकेवर राष्ट्रवादीने वर्चस्व मिळविले़ स्थानिक पातळीवरही राष्ट्रवादी काँग्रेसने मजबूत जाळे विनले असल्याने लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांना या मतदारसंघातून आघाडी मिळेल, अशी परभणीपासून बारामतीपर्यंत चर्चा होती़ त्यामुळेच परभणी लोकसभेची जागा यावेळी खात्रीने राष्ट्रवादीच्या पारड्यात पडेल, असा अंदाजही बारामतीकरांसह एक्झिट पोल करणाऱ्या संस्थांनी व्यक्त केला होता; परंतु, या संदर्भात सर्वांनीच व्यक्त केलेल्या अपेक्षा निकालांती फोल ठरल्या आहेत़ कागदावर तगड्या दिसणाºया राष्ट्रवादी काँग्रेसला येथे लोकसभेला लिड न मिळता शिवसेनेवर मतदारांनी अधिक विश्वास दाखविला़ त्यामुळे आ़ विजय भांबळे यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़ मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या ताब्यातील सर्वच गटात राष्ट्रवादीची पिछेहाट झाली असून, स्वपक्षाचेच लोकप्रतिनिधी व पदाधिकारी आ़ भांबळे यांच्या कार्यशैलीवर नाराज असल्याचे स्पष्ट झाले आहे़ जिल्हा परिषद सदस्य असो की नगरपालिकेचे सदस्य असो; प्रत्येकाच्या कामामध्ये आ़ भांबळे यांचा हस्तक्षेप असतोच असाच आरोप या पक्षाचे सदस्य खाजगीत करीत आहेत़ त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत त्यांनी मनापासून काम केले नसल्याची चर्चा आहे़ लोकसभेच्या निकालानंतर भांबळे यांनी जि़प़ गटनिहाय कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन त्यांची नाराजी दूर करणे सुरू केले आहे़दुसरीकडे भाजपाचे माजी आ़ रामप्रसाद बोर्डीकर यांनी लोकसभा निवडणुकीचे वातावरण कायम ठेवून मागील विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी कंबर कसली आहे़ शिवसेना-भाजपा युतीमध्ये जिंतूरची जागा शिवसेनेच्या वाट्याला आलेली आहे़ जि.प. तील शिवसेनेचे गटनेते राम खराबे यांनी पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे़ राज्यस्तरावरील चर्चेनुसार शिवसेना-भाजपा एकत्रच विधानसभेची निवडणूक लढविणार असल्याचे समजते. असे झाल्यास जिंतुरातून युतीकडून बोर्डीकर की खराबे पाटील उमेदवार राहणार, हे आणखी तीन महिने तरी अनिश्चित राहणार आहे़ विशेष म्हणजे दोन्ही नेत्यांकडून निवडणुकीची तयारी सुरू आहे़ मेघना बोर्डीकर यांनी लोकसभेचीच तयारी केली होती़ परंतु, त्यांनी ऐनवेळी माघार घेतली़ आता विधानसभेच्या तयारीला त्या लागल्या आहेत़ त्यामुळे त्या स्वत: विधानसभा निवडणुकीत लढणार की त्यांचे वडील रामप्रसाद बोर्डीकर हे निवडणूक लढणार हेही पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे़विनोद बोराडे यांची लोकसभेला सोयीची भूमिका४सेलूचे नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी अडीच वर्षापूर्वी पालिकेवर जनशक्ती विकास आघाडीच्या माध्यमातून वर्चस्व प्रस्थापित केले़ परंतु, लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांनी सोयीची भूमिका घेवून दोन्ही उमेदवारांना खूष ठेवण्याचा प्रयत्न केला़४एकीकडे राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्यासाठी काम करीत असल्याचे चित्र निर्माण केले गेले तर दुसरीकडे त्यांचे उजवे हात मानले जाणारे काही नगरसेवक शिवसेनेचे संजय जाधव यांचे उघडउघड प्रचाराचे काम करीत असल्याचे दिसून आले़ त्यामुळे बोराडे यांची आतापर्यंत तरी सोयीची भूमिका दिसून आली़ परंतु, माजी आ़ बोर्डीकर व बोराडे यांच्यातील राजकीय वितुष्ट भांबळे यांच्या पथ्यावर पडू शकते़

टॅग्स :parabhaniपरभणीElectionनिवडणूक