लोकमत न्यूज नेटवर्कमानवत : अग्निशमन सुरक्षा सिलेंडरची रक्कम मागण्याच्या कारणावरुन दोन गटात हाणामारी झाल्याची घटना मानवत येथे ७ डिसेंबरच्या रात्री १० वाजता घडली.शहरातील गजानन बारहाते यांचा अग्निशमन सुरक्षा यंत्रणा बसविण्याचा व्यवसाय आहे. त्यांनी शहरातील बालरोग तज्ज्ञ डॉ. विठ्ठल काळे यांच्या खाजगी दवाखान्यात गॅस सिलेंडर बसविले होते.बसविलेल्या गॅस सिलेंडरची रक्कम मागण्यासाठी गजानन बारहाते गेले असता डॉ.काळे यांनी युवराज लाड, किशोर लाड यांच्यासह ८ ते १० जणांना बोलावून मारहाण केल्याची तक्रार गजानन बारहाते यांनी पोलीस ठाण्यात दिली. तर गजानन बारहाते, किशन बारहाते यांच्यासह ८ ते १० जणांनी गॅस सिलेंडर भरण्याचे पैसे का देत नाही, असे म्हणून शिवीगाळ करुन मारहाण करीत दवाखान्यातील काच फोडले व जिवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार डॉ. विठ्ठल काळे यांनी मानवत पोलीस ठाण्यात दिली. या प्रकरणी ५ जणांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
परभणी : मानवत येथे दोन गटांत हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:44 IST