शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पुरवठा विभागातील अव्वल कारकून चतुर्भूज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:30 IST

वडिलांच्या नावे असलेले रेशनकार्ड तीन भावांच्या नावे विभक्त करून देण्यासाठी ३ हजारांची लाच घेणाऱ्या पाथरी येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या अव्वल कारकुनास लाचलुचपत विभागाच्या पथकाने १६ मार्च रोजी सापळा रचून रंगेहाथ पकडले.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी : वडिलांच्या नावे असलेले रेशनकार्ड तीन भावांच्या नावे विभक्त करून देण्यासाठी ३ हजारांची लाच घेणाऱ्या पाथरी येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या अव्वल कारकुनास लाचलुचपत विभागाच्या पथकाने १६ मार्च रोजी सापळा रचून रंगेहाथ पकडले.पाथरी तालुक्यातील रेणापूर येथील तक्रारदार यांनी तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागात गेल्या दोन महिन्यापूर्वी आपल्या वडिलांच्या नावे असलेले रेशनकार्ड तीन भावांच्या नावे विभक्त करून सर्व कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज सादर केला होता. मात्र या कामासाठी प्रत्येकी १ हजार रुपये या प्रमाणे तीन भावांसाठी ३ हजारांची मागणी पुरवठा विभागातील अव्वल कारकून भरत कचरु घनसावध यांनी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी परभणी येथील लाचलुचपत विभागाकडे लेखी तक्रार नोंदविली होती. १५ मार्च रोजी तहसील कार्यालय पाथरी येथे पडताळणी करण्यात आली. त्यानंतर १६ मार्च रोजी तहसील कार्यालयात सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून २८०० रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना भरत घनसावध यास रंगेहाथ पकडण्यात आले. पोलीस उपअधीक्षक एन.ए. बेंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक भारती, अनिल गव्हाणकर, पो.हे. लक्ष्मण मुरकुटे, अनिल कटारे, माणिकराव चट्टे यांंनी कारवाई केली.दरम्यान, या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.