शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : तीन वेगवेगळ्या घटनांत महिलेसह तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 00:22 IST

शहरासह तालुक्यातील आडगाव आणि बामणी येथे झालेल्या तीन घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. १५ जुलै रोजी या घटना घडल्या असून पोलिसांनी तीनही घटनांची नोंद घेतली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी): शहरासह तालुक्यातील आडगाव आणि बामणी येथे झालेल्या तीन घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. १५ जुलै रोजी या घटना घडल्या असून पोलिसांनी तीनही घटनांची नोंद घेतली आहे.शहरातील औंढा रोडवरील औद्योगिक वसाहतीमध्ये १५ जुलै रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास संदीप विक्रमसिंग सेंधव (३०) हा ट्रकच्या टपावरील दोरी काढण्यासाठी वर चढला असता त्याला विजेच्या तारांचा स्पर्श झाला. या घटनेत संदीप सेंधव याचा जागीच मृत्यू झाला.याच दिवशी रात्री १२ वाजेच्या सुमारास तालुक्यातील आडगाव येथे वैजनाथ हिवाळे यांची मुलगी मीनाक्षी हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वैजनाथ हिवाळे यांनी जिंतूर पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार मीनाक्षी हिचे लग्न १९ मार्च २०१७ रोजी आडगाव येथील प्रमोद दाभाडे याच्यासोबत झाले होते. घरातील कामास कंठाळून तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे माहिती वैजनाथ हिवाळे यांनी दिली. त्यावरुन जिंतूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.पाण्यात बुडून गुराख्याचा मृत्यू४नदीपात्रात बुडून एका गुराख्याचा मृत्यू झाल्याची घटना १५ जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास बामणी परिसरात घडली. बामणी येथील प्रल्हाद सुदाम वाकळे (३८) हे सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास गुरे चारण्यासाठी गेले होते.४येलदरी तलाव परिसरात एक म्हैस ओढ्याच्या पलीकडच्या दिशेने जात असल्याने प्रल्हाद वाकळे हे पाण्यात उतरले. यावेळी या पाण्यामध्ये कोणीतरी मासे पकडण्याचे जाळे टाकले होते. या जाळ्यात अडकून प्रल्हाद वाकळे यांचा मृत्यू झाला. शिवाजी वाकळे यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. या प्रकरणी बामणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली आहे. मयत प्रल्हाद वाकळे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWomenमहिलाDeathमृत्यू