शहरं
Join us  
Trending Stories
1
“निवडणूक आयोग हा भाजपाची विस्तारित शाखा, फडणवीसांना वकील कुणी केले?”; संजय राऊतांची टीका
2
एकनाथ शिंदेंच्या गडाला भाजपा सुरूंग लावणार?; ठाण्यात स्वबळावर लढण्याची तयारी, इच्छुकांची शाळा
3
आम्ही आधी आमच्या देशाचा विचार करू; डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' दाव्यावर भारताची स्पष्टोक्ती
4
डोनाल्ड ट्रम्प ज्या देशावर चिडतात, त्यालाच भारत देणार 'आकाश' मिसाइल; अमेरिकेला दिला झटका
5
कर्जदाराचा मृत्यू झाल्यास बँक कर्जाची वसुली कशी करते? गृह, कार आणि पर्सनल लोनचे नियम काय सांगतात?
6
ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी विराट कोहलीने या व्यक्तीच्या नावावर केली मालमत्ता, किती कोटींची संपत्ती?
7
कर्तव्यनिष्ठेला सलाम! पोलिओ लसीकरणासाठी 'आशा वर्कर'ची २८ किमीची पायपीट, मुलांसाठी धडपड
8
जीएसटी 2.0: घरगुती फराळावर जीएसटी कपातीचा किती फायदा झाला? पहाल तर शॉक व्हाल....
9
'या' ५ घटनांचा उल्लेख करत राहुल गांधींनी निशाणा साधला; म्हणाले, “मोदी हे ट्रम्प यांना घाबरतात”
10
PM मोदींच्या वाढदिवसाला सुरु केलेल्या १० योजना बंद? अंबादास दानवे आक्रमक; शिंदेंना करुन दिली 'बाळासाहेबां'ची आठवण
11
कतारने पुन्हा एकदा दाखवली आपली ताकद! एका फोनवर थांबवलं पाक-अफगाणिस्तानचं युद्ध 
12
Video - भलताच स्टार्टअप! तिकीट काढलं, मेट्रोत चढला अन् मागितली भीक; प्रवासी झाले हैराण
13
कायद्याचा गुन्हेगारांना धाक, तर जनतेला सुरक्षित वाटले पाहिजे; मुख्यमंत्री विष्णु देव साय यांचे कडक निर्देश
14
राज ठाकरेंनी केली नक्कल, अजितदादांनी दिले उत्तर; म्हणाले, “मिमिक्री करणारे फक्त आता...”
15
अंकुश चौधरी-तेजश्री प्रधानच्या 'ती सध्या काय करते'चा सीक्वेल येणार? सतीश राजवाडे म्हणाले...
16
रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारताची 'नो कमेंट', पण भूमिकेवर ठाम
17
धक्कादायक! मोबाईलवर गेम खेळताना १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू; 'सडन गेमर डेथ' म्हणजे काय?
18
मिलेनियल्स ठरवत आहेत घरांचा ट्रेंड; १ ते १.५ कोटी रुपयांच्या घरांना मिळतेय सर्वाधिक पसंती, कोणतं शहर आवडीचं?
19
'तो' एक सेकंद वाचवून गेला जीव! किरकोळ वाद झाला, पत्नी उडी मारणार तेवढ्यात पतीने हात पकडला
20
चीनने दुखती नस दाबताच अमेरिका नरमला! भारताकडे मागितली मदत; म्हणाले, आपण आता...

परभणी : साडेसहा हजार कर्मचारी मतदान केंद्रात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 23:51 IST

जिल्ह्यातील चारही मतदारसंघात सोमवारी १५०६ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पाडली जात असून मतदान यंत्रासह जिल्हाभरातील सुमारे साडेसहा हजार कर्मचारी मतदान केंद्रांवर दाखल झाले आहेत. रविवारीच रात्रीच ही केंद्रे मतदानासाठी सज्ज करण्यात आली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील चारही मतदारसंघात सोमवारी १५०६ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पाडली जात असून मतदान यंत्रासह जिल्हाभरातील सुमारे साडेसहा हजार कर्मचारी मतदान केंद्रांवर दाखल झाले आहेत. रविवारीच रात्रीच ही केंद्रे मतदानासाठी सज्ज करण्यात आली आहेत.परभणी, जिंतूर, पाथरी आणि गंगाखेड या चार विधानसभा मतदारसंघासाठी सोमवारी मतदान होत आहे. चारही मतदान केंद्रांतील ५३ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होत आहे. मतदान प्रक्रियेसाठी लागणारी सर्व यंत्रणा प्रशासनाने रविवारीच सज्ज ठेवली आहे. रविवारी दुपारी १२ वाजेपासून प्रत्येक मतदारसंघातील स्ट्राँगरुम येथून कर्मचाऱ्यांना मतदान यंत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच मुख्यालयापासून ते मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था केली होती. प्रत्येक कर्मचाºयाला दिलेल्या मतदान केंद्रानुसार मतदान यंत्राचे वाटप करण्यात आले. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मतदान अधिकारी, कर्मचारी मतदान केंद्रावर दाखल झाले होते. या ठिकाणी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रात्रीतून मतदान यंत्राची सुसज्जता केली आहे. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात होत आहे. तत्पूर्वी सकाळी ५.४५ वाजता मॉकपोल घेतले जाणार आहे.सर्व मतदान केंद्रावर मतदारांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यामध्ये वीज, पिण्याचे पाणी यासह ऊन, पावसापासून बचाव करण्यासाठी मतदान केंद्राच्या परिसरात मंडप टाकण्यात आला आहे. तसेच दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर रॅम्पची व्यवस्था केली आहे. या निवडणुकीत दिव्यांग मतदारांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून त्यासाठी स्वयंसेवक व स्वयंसेवी संघटनांची मदत घेतली जात आहे. एकही दिव्यांग मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्यात येणार आहे. दिव्यांग मतदाराच्या वास्तव्यापासून ते मतदान केंद्रापर्यंत वाहनांची व्यवस्था करण्याच्या सूचनाही संबंधितांना देण्यात आल्या आहेत.एकंदर जिल्हा प्रशासनाने मतदानाची संपूर्ण तयारी केली आहे. मतदान केंद्राच्या परिसरात १०० मीटरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेशही लागू करण्यात आले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक तो पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय मतदान यंत्र बिघडण्याची शक्यता लक्षात घेऊन १० टक्के यंत्र राखीव ठेवले आहेत. सोमवारी जास्तीत जास्त मतदान करुन घेण्यावर प्रशासन भर देणार आहे.परभणी मतदारसंघ: १ हजार ३०० कर्मचाºयांची नियुक्ती४परभणी विधानसभा मतदारसंघात ३०२ मतदान केंद्र असून मतदान केंद्र अध्यक्ष आणि तीन मतदान अधिकारी अशी १ हजार ३३२ कर्मचाºयांची या केंद्रावर नियुक्ती करण्यात आली आहे.४जिंतूर मतदासंघात ४०७ मतदान केंद्रे असून ४४६ मतदान केंद्र अध्यक्ष आणि तेवढेच मतदान केंद्र अधिकारी अशा १ हजार ७८४ कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे.४गंगाखेड मतदारसंघात ४०३ मतदान केंद्रे असून ४४७ मतदान केंद्र अध्यक्ष आणि तेवढेच मतदान केंद्र अधिकारी अशी १ हजार ७८८ कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे.४पाथरी विधानसभा मतदारसंघात ३९४ मतदान केंद्रे असून या केंद्रावर ४३५ मतदान केंद्र अध्यक्ष आणि त्याच प्रमाणात ३ मतदान केंद्र अधिकाºयांची नियुक्ती केली आहे. या मतदार संघात १ हजार ७४० अधिकारी- कर्मचारी प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदविणार आहेत.४याशिवाय चारही मतदारसंघामध्ये ६३ सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. त्यात जिंतूरमध्ये २०, परभणीमध्ये २२, गंगाखेड १३ आणि पाथरी मतदारसंघात ८ सूक्ष्म निरीक्षकांचा समावेश आहे. या सर्व अधिकारी- कर्मचाºयांच्या माध्यमातून मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.४ सखी मतदान केंदे्रजिल्ह्यात ४ सखी मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये शारदा विद्यामंदिर, जिंतूर, गांधी विद्यालय एकतानगर परभणी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोदावरी तांडा आणि जिल्हा परिषद मुलींची शाळा, पाथरी या मतदान केंद्रांचा समावेश आहे. या सर्व मतदान केंद्रांचा कारभार महिला अधिकारी- कर्मचारी पाहणार आहेत.